ब्रँडच्या नावाखाली बनावट कपड्यांचा गोरखधंदा ; कोंढव्यात पोलिसांची धडक कारवाई…
नामांकित ब्रँडचा लोगो लावून बनावट कपडे विक्री ; पुण्यात तिघांवर गुन्हा...

पुणे : नामांकित आस्थापनांच्या ब्रँड नावाखाली बनावट कपडे आणि पादत्राणे विक्रीस ठेवून कॉपीराइट उल्लंघन करणाऱ्या तिघांविरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बनावट टी-शर्ट, ट्रॅक पँट, शॉर्ट पँट, जॅकेट, चप्पल आणि बूट जप्त करण्यात आले.
गुन्हा दाखल झालेले आरोपी…
या प्रकरणी उबेद शेख, जैद अन्सारी आणि हुसेन अन्सारी यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांनी नामांकित कंपन्यांच्या लोगोचा गैरवापर करून बाजारात बनावट उत्पादने विक्रीस ठेवली होती
तक्रार आणि पोलिसांची कारवाई…
तक्रारदार महेंद्र देवरा यांनी कोंढवा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर ११ ऑगस्ट रोजी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी भाग्योदयनगर येथील नूर फॅशन आणि कोंढव्यातील आश्रफनगर मधील मिस्टर अली गारमेंट्स या दुकानांवर छापा टाकून बनावट माल जप्त केला.
कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा…
आरोपींनी विक्रीस ठेवलेली सर्व उत्पादने नामांकित आस्थापनांचा लोगो वापरून बनावट तयार केलेली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कॉपीराइट अॅक्ट आणि इतर संबंधित कायद्यांनुसार त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.
पोलिसांकडून पुढील तपास…
कोंढवा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून, या नेटवर्कमध्ये आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेत आहेत.
Editer sunil thorat



