
पुणे : आगामी गणेशोत्सव २०२५ शांततेत, सुव्यवस्थित व निर्विघ्न पार पडावा यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल्ल व पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे यांनी लोणावळा, खेड, जुन्नर व शिरूर उपविभागातील १८ पोलीस स्टेशन हद्दीतील १२८ गणेश मंडळांचे अध्यक्ष, पोलीस पाटील व संबंधित पोलीस अधिकारी यांची विशेष आढावा बैठक घेतली.
ही बैठक पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण (चव्हाणनगर) येथील भिमाशंकर सभागृहात झाली. बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, उत्पादन शुल्क विभाग, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आदी विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
9
पोलीस अधीक्षक गिल्ल यांचे स्पष्ट निर्देश
बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक गिल्ल यांनी गणेश मंडळांना शिस्तबद्ध व जबाबदार वर्तनाचे आदेश दिले.
त्यामध्ये प्रमुख सूचना पुढीलप्रमाणे असतील
प्रत्येक मंडळाने किमान ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक…
गणेश मंडळ परिसरात व गावात स्वच्छतेकडे विशेष लक्ष.,.
कर्णकर्कश ध्वनीक्षेपक व लेझर लाईट शो टाळणे…
वर्गणी व देणगीसाठी जबरदस्ती न करण्याचे आवाहन…
सामाजिक जबाबदारीतून वृक्षारोपण, खेळांच्या स्पर्धा, जनजागृती उपक्रम आयोजित करणे…
महिलांविरोधातील छेडछाड, बालविवाह व अंमली पदार्थविरोधी जनजागृतीवर विशेष भर…
विसर्जन मिरवणुकीत काटेकोर शिस्त…
अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान काटेकोर शिस्त पाळण्याचे आदेश दिले.
–मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे.
–लहान मुलांना नदीपात्राकडे जाऊ न देणे.
–निर्माल्य नदीत विसर्जित न करता योग्य व्यवस्थापन करणे.
–विसर्जन घाटांवर योग्य नियोजन व समन्वय राखणे.
मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद…
बैठकीदरम्यान अनेक गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिला. वृक्षारोपण, सीसीटीव्ही बसविणे, खेळांच्या स्पर्धांचे आयोजन, ध्वनीप्रदूषण नियंत्रण यासाठी पुढाकार घेणाऱ्या मंडळाध्यक्षांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
गणेशोत्सव निर्विघ्न होण्यासाठी आवाहन…
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी सर्व उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “गणेशोत्सव हा श्रद्धा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. मात्र यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सर्व गणेश मंडळांनी जबाबदारीने वर्तणूक करावी, नियमांचे पालन करावे. अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.” बैठकीच्या शेवटी सर्व मंडळाध्यक्ष, पोलीस पाटील व अधिकारी यांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
Editer sunil thorat





