
पुणे : श्री गणेश प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिक व मंडळांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने तात्पुरते बदल केले आहेत. हे बदल २५ ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील, अशी माहिती पोलीस उपआयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी दिली.
मूर्ती विक्रीचे स्टॉल मुख्यतः डेंगळे पुल ते शिवाजी पुलादरम्यान, श्रमिक भवन समोर, कसबापेठ पोलीस चौकी ते जिजामाता चौक, मंडई परिसर, सावरकर पुतळा ते सिंहगड रोड, तसेच कुंभारवाडा व मुंढवा (केशवनगर) येथे असल्याने या परिसरात वाहतुकीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
वाहतूक बंद मार्ग पुढीलप्रमाणे…
गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक वाहतुकीस बंद.
वाहनचालकांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक या मार्गाचा वापर करावा.
शिवाजीनगरहून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे जावे.
एकेरी वाहतूक (One-way) पुढीलप्रमाणे…
फडके हौद चौक – जिजामाता चौक – फुटका बुरुज मार्ग
आप्पा बळवंत चौक – बुधवार पेठ चौक – मोती चौक
मंगला टॉकीज समोरून प्रिमीयर गॅरेज लेन – कुंभारवेस
नो-पार्किंग क्षेत्र पुढीलप्रमाणे…
सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड)
मूर्ती विक्रीदरम्यान या रस्त्यावर वाहन उभे करणे सक्त मनाई
पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे असणार…
मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा
जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक (डावा भाग)
निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन
नदीपात्रातील रस्ता (टिळक पुल – भिडे पुल दरम्यान)
मंडईतील मिनर्व्ह व आर्यन पार्किंग तळ
शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक (फक्त डावा भाग)
बस वाहतूक बदल पुढीलप्रमाणे असणार…
शिवाजीनगर स्टॅण्डहून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस आता शिवाजी रोडऐवजी जंगली महाराज रोड – टिळक चौक – टिळक रोड मार्गे जातील.
कार्पोरेशन बसस्टॉप येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस झाशी राणी चौक – जंगली महाराज रोड – अलका टॉकीज – टिळक रोड मार्गे जातील.
मुंढवा (केशवनगर) विशेष बदल – २७ ऑगस्ट
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मांजरीकडे जाणाऱ्या वाहनांना गायरान वस्ती रोडमार्गे वळवले जाईल.
गायरान वस्तीहून मुंढवा चौकाकडे येणाऱ्या वाहनांना रेणुका माता मंदिर मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध.
पोलीसांनी सर्व वाहनचालकांना आवाहन केले आहे की, तात्पुरते लागू करण्यात आलेल्या या बदलांचा अवलंब करून वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे, ज्यामुळे गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहील.
Editer sunil thorat




