क्राईम न्युज

मोबाईल हिसकावणाऱ्यांना लोणी काळभोर पोलिसांचा दणका ; लाखोंचे मोबाईल व दुचाकी जप्त…

पुणे (हवेली) : लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत दि. १७/०५/२०२५ रोजी रात्री २१/०० वा. चे सुमारास इसम नामे अनिरुध्द संतोष खताळ रा. कदमवाकवस्ती पुणे हे त्यांचा मित्र नामे राजिव शहा यांचे सोबत, कदमवाकवस्ती येथील जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे समोर, पुणे सोलापुर रोड लगत असलेल्या सर्वांस रोड ने पायी चालत जात असताना, दोन अनोळखी इसम एका मोपेड दुचाकी गाडीवरुन पाठीमागुन आले व त्यांनी अनिरुध्द संतोष खताळ यांचे हातातील विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट हिसकावुन घेवुन चोरुन नेला.

याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस दि. १७/०५/२०२५ रोजी गु. र. नं. २१६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.

या गुन्हयाचे तपासा दरम्यान पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव व त्यांचे पथकास खबर प्राप्त झाली की दि. ०७/०७/२०२५ रोजी दाखल गुन्हयातील आरोपीत इसम हे गुन्हयात चोरुन नेलेला मोबाईल विकण्यासाठी कवडीपाट टोल नाका, कदमवाकवस्ती येथे येणार आहेत. सदर खबर प्राप्त होताच पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव व त्यांचे पथकाने कवडीपाट टोलनाका येथे सापळा रचुन दुचाकी मोपेड गाडीवरुन आलेल्या दोन संशयीत इसमांना दि. ०७/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या इसमांकडे त्यांचे नाव पत्त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता १) विशाल विलास काळे वय २३ वर्षे रा. ढेरे बंगल्याजवळ, गोपाळपट्टी, मांजरी पुणे २) रितेश भिमराव चव्हाण वय १८ वर्षे रा. गोपाळपट्टी मांजरी रोड, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना लोणी काळभोर पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये लोणी काळभोर पोलीस ठाणे गु. र. नं. २१६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३(५) मधील फिर्यादी यांचा हिसकावुन चोरुन नेलेला विवो कंपनीचा मोबाईल मिळुन आला.

मोबाईल हा दाखल गुन्हयातील फिर्यादी यांचा असल्याची खात्री झाल्याने तसेच त्यांचे ताब्यातील दुचाकी मोपेड गाडी ही त्यांनी गुन्हयात वापरलेली असल्याचे आरोपींनी कबुल केल्याने त्यांच्याकडुन मोबाईल व दुचाकी मोपेड अॅक्टीवा गाडी त्यांचेकडुन प्रथमतः जप्त करणेत आली व दाखल गुन्हयात आरोपीतांना दि. ०७/०७/२०२५ रोजी १९/५० वा. अटक करणेत आले.

या गुन्हयाचे अनुषंगाने आरोपींकडे सखोल तपास केला असता पकडलेल्या आरोपीकडुन दाखल गुन्हयातील मोबाईल व्यतिरीक्त आणखी विवीध कंपनीचे १८ अॅन्ड्रॉईड मोबाईल हॅन्डसेट जप्त करणेत आले आहेत. संबंधित व्यक्तीकडून १८ मोबाईल हॅन्डसेट हे आरोपीने विवीध ठिकाणी अशाच प्रकारे चोरले असल्याचे कबुल केले आहे. मोबाईल चोरीबाबत इतर पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत का ? याबाबत लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव व त्यांचे पथकाने अटक आरोपीकडून एकूण ४,१९,०००/- रुपयांचे एकुण १९ मोबाईल फोन व ५०,०००/- रुपये किंमतीची अॅक्टीवा मोपेड गाडी असा एकूण ४,६९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आला असुन, सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु आहे.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्मिता पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पोहवा संभाजी देवीकर, गणेश सातपुते, रामहरी वणवे, सागर जगदाळे, तेज भोसले, आण्णा माने, पो.शि. बाजीराव विर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, चक्रधर शिरगिरे, राहुल कर्डीले, प्रविण दडस, प्रदिप गाडे, सचिन सोनवणे, सुरज कुंभार, मपोशि उषा थोरात यांनी केली आहे.

मुख्य संपादक श्री सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??