जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

महसूल सेवक (कोतवाल) यांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा ; हवेली तालुका अध्यक्ष सुरेश शेलार…

हवेली (पुणे) : महाराष्ट्रातील महसूल सेवक (कोतवाल) यांना शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, नियमित वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू कराव्यात, या मागणीसाठी हवेली तालुका कोतवाल संघटनेकडून जिल्हाधिकारी व तहसीलदार मार्फत शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

जबाबदाऱ्यांचा बोजा प्रचंड…

कोतवाल हे महसूल गावातील मूलभूत कामकाजात कायम तत्पर असतात. महसुली कामकाजाबरोबरच त्यांच्याकडून निवडणुक विषयक कामे, ई-पिक नोंदणी, नैसर्गिक आपत्तीतील पंचनामा, महसुली वसुली, शिपाई, चौकीदार, स्वच्छक, संगणक चालक, अगदी महसूल सहाय्यक अशी विविध कामे करून घेतली जातात. ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या या पदाला अद्याप चतुर्थ श्रेणीचा शासकीय दर्जा न देणे, हीच अन्यायाची बाब असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

इतर पदांशी तुलना…

पोलिस पाटील (सन 1967) व अंगणवाडी (सन 1996) या पदांना शासनाने वेळोवेळी मानधनात वाढ दिली आहे. मात्र, या पदांचे कामकाज मर्यादित असून त्यांना इतरत्र जबाबदाऱ्या देण्यात येत नाहीत. उलट कोतवालांना महसूल विभागातील विविध जबाबदाऱ्या पार पाडूनही अद्याप शासकीय कर्मचारी म्हणून वर्गवारी देण्यात आलेली नाही.

आंदोलनाची हाक…

या मागणीसंदर्भात महसूल सेवक संघटनेने यापूर्वीही महसूल मंत्रीमुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते. मात्र शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे.

21 सप्टेंबर रोजी “बोंबाबोंब आंदोलन”

22 सप्टेंबर रोजी “मुंडन आंदोलन”

23 सप्टेंबर रोजी “अर्धनग्न आंदोलन”

ही आंदोलने संविधान चौक, नागपूर येथे राज्यभरातील कोतवालांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे सांगण्यात आले.

हवेलीतील निवेदन…

हवेली तालुका कोतवाल संघटनेकडून हे निवेदन तहसीलदार किरण सुरवशे यांना प्रत्यक्ष हवेली तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सुरेश शेलार व पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले. तर अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या कार्यालयात आवक-जावक नोंदवण्यात आले.

संघटनेचे पदाधिकारी उपस्थित…

या वेळी हवेली तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सुरेश शेलार, सचिव देवा मंडोळे, उपाध्यक्ष दशरथ वगरे, खजिनदार शिवाजी भाकर तसेच सदस्य अविनाश वाघमारे, योगेश पवार, रामलिंग भोसले, बंटी राजपुरे, धनंजय कदम, कांताराम लोंढे, आशिष आग्नेय, पांडुरंग चव्हाण, प्रगती शिंदे, सुवर्णा भोसले, संभाजी भंडलकर, विठ्ठल कुंभार आदी उपस्थित होते.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??