महिलांसाठी स्वावलंबनाचा दीपस्तंभ ; नवजीन महिला गृहउद्योग…

मांजरी (पुणे) : घरगुती जबाबदाऱ्यांसोबत आर्थिक हातभार लावण्याची इच्छा असलेल्या महिलांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि प्रत्येक घरातून एक उद्योजिका घडावी, हा विचार प्रत्यक्षात उतरवणारा उपक्रम म्हणजे नवजीन महिला गृहउद्योग (NMGU). २०१६ साली लोणी काळभोर येथील काही महिलांनी लहानशा स्वरूपात सुरुवात केलेल्या या गृहउद्योगाने आज महाराष्ट्रभर आपली पावले रोवली आहेत.
सुरुवातीचा संघर्ष – आणि महिलांची जिद्द
किर्ती बोंगार्डे यांच्या नेतृत्वाखाली मीना ताम्हाणे, घंटे, कुलकर्णी, मनीक काळभोर, उर्मिला भुमकर, स्वाती टिळेकर, संगीता बोराटे, खांबकर, गौरी गायकवाड, आशा घंटे, मनीषा राऊत, हजरे, तुपे अशा काही महिलांनी एकत्र येऊन उपक्रम सुरू केला. घरगुती पदार्थ बनवून विक्री करताना बाजारपेठ मिळवण्यात सुरुवातीला अनेक अडचणी आल्या; पण महिलांच्या चिकाटीमुळे “कवडी कवडी” कमाई करत त्यांनी अनुभव आणि ग्राहक दोन्ही मिळवले.
मोफत प्रशिक्षण – उत्पादनापासून विक्रीपर्यंत
नवजीन महिला गृहउद्योगात महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
यामध्ये –
केक, मोदक, बिस्किटे, मसाले, पुलाव, पराठा हाऊस, पुरणपोळी, दिवाळी फराळ
उन्हाळी वाळवण (पापड, लोणची, मसाले)
मेकिंग – पॅकिंग – विक्री तंत्र
याशिवाय पारंपरिक पदार्थ जसे झुणका-भाकर, खारवडी, मसवडी, मिसळ, शिरा, खीर, गावठी मेजवानी यांचेही प्रशिक्षण दिले जाते.
यामुळे महिलांना चव जपत पौष्टिकता व स्वच्छता याकडेही लक्ष देता येते.
आरोग्य आणि परंपरेचा संगम…
भारतीय आरोग्य सुधारावर विशेष भर देऊन पारंपरिक धान्यांपासून पदार्थ तयार केले जातात.
हातसडी तांदूळ, इंद्रायणी, खपली गहू, नागली, बाजरी, मका, नाचणी, तिळ, मेथी, राजगिरा, ज्वारी या धान्यांपासून तयार झालेले पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचतात.
यातून चव आणि परंपरा जपली जाते तसेच आरोग्यदायी आहाराचा प्रसार होतो.
मान्यता आणि यशोगाथा…
नवजीन महिला गृहउद्योगाने बनवलेले Susana मसाले, ओवी मसाले, आदेेश बडेखेकर होम मिनिस्टर मसाले हे उत्पादन आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि लोकमत–सकाळसारख्या स्पर्धांमधून गौरवले गेले आहेत.
तसेच महिलांनी Eyecard कंपनी, Geol कंपनी, Somboy Noodles, Madhumeta Ghee Company यांसोबत मार्केटिंगचे काम करून उद्योगविश्वातही आपले वेगळेपण दाखवले आहे.
विशेष सहकार्य आणि प्रोत्साहन…
या कार्यात डॉ. गरिमा कवठेकर यांचे विशेष योगदान आहे.
Grehlakshmi Mrs. India 2022 (1st Runner-up)
Mrs. Maharashtra Empress of Maharashtra 2021
Founder Director – Nisarg Srishti Welfare Foundation
CEO – BEATS Export Import Company
TEDx Speaker & Influencer
डॉ. कवठेकर यांनी नवजीन महिला गृहउद्योगाला सामाजिक उपक्रम, बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.
तसेच अभिनेते सुबोध भावे व रश्मी महाजनी यांच्यासह अनेक कलाकार, सामाजिक संस्था व बचत गटांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे.
महाराष्ट्रापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत…
आज नवजीन महिला गृहउद्योगांतर्गत शेकडो महिलांना उत्पादन युनिट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रशिक्षण देऊन त्यांना विक्रीची संधी दिली जाते.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्राहक गट निर्माण झाले असून आता या पदार्थांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी वाढू लागली आहे.
भविष्यदृष्टी…
किर्ती बोंगार्डे यांचे ध्येय स्पष्ट आहे –
> “महिला म्हणजे घराचा आधारस्तंभ. त्यांच्या हातात स्वावलंबनाची किल्ली देणे, त्यांना उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देणे आणि परंपरा जपत आरोग्यदायी आहाराचा प्रसार करणे, हेच आमचे ध्येय आहे.”
नवजीन महिला गृहउद्योग आज फक्त एक संस्था नाही, तर महिला स्वावलंबनाचा दीपस्तंभ ठरली आहे. घरगुती पदार्थांना ओळख देत, महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आणि भारतीय परंपरेची चव जपत, हा उपक्रम महाराष्ट्राच्या पलीकडेही झेपावू लागला आहे.
Editer sunil thorat








