माळशिरसच्या विजयकृष्ण थोरातने १० वर्षाखालील राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत ब्रांझ मेडल पटकावले ….

डॉ गजानन टिंगरे
सोलापूर (माळशिरस) : माळशिरसच्या सुपुत्राने राष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे.
धनुर्धारी विजयकृष्ण स्वाती नवनाथ थोरात याने राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत ब्रांझ पदक पटकावले आहे. या विजयाने माळशिरसचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
ही प्रतिष्ठित स्पर्धा दि. २३ व २४ मार्च रोजी आंध्रप्रदेश (गंटूर) येथे पार पडली, जिथे देशभरातून आलेल्या दिग्गज धनुर्धार्यांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. विजयकृष्ण थोरात याने अचूक तिरंदाजी करत प्रत्येक फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली आणि अंतिम फेरीत ६ गुणांसह विजेतेपद मिळवले.
या अभूतपूर्व यशाबद्दल विजयाबद्दल प्रशिक्षक सुरज ढेंबरे , शेखर देवकर , निखिल गुरव सर यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “विजयकृष्णच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळेच हे शक्य झाले आहे. भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकण्याची पूर्ण क्षमता ठेवतो.”
विजयकृष्णच्या या यशाबद्दल त्याच्या कुटुंबीयांनी, मित्रपरिवाराने आणि माळशिरसवासीयांनी आनंद व्यक्त केला आहे. संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



