महाराष्ट्रराजकीयसामाजिक

आता माझं शेवटचं सांगणं : जरांगे पाटील यांची आंदोलकांना कडक ताकीद…

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना धारेवर धरत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. “गोंधळ घालायचा असेल तर निघून जा,” अशी कडक ताकीद त्यांनी आंदोलकांना दिली. उच्च न्यायालयाने आंदोलकांना फोर्ट परिसरातील रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर जरांगे यांनी हे वक्तव्य केले.

उच्च न्यायालयाचे आदेश…

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून जरांगे आझाद मैदानात उपोषण करत आहेत. दरम्यान, हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांमुळे वाहतूक कोंडी, गोंधळ आणि उपद्रव वाढल्याने एमी फाउंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर 1 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. न्यायालयाने आंदोलकांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करत आंदोलन विनापरवानगी असल्याचे स्पष्ट केले. तसेच 2 सप्टेंबर दुपारी फोर्ट परिसरातील रस्ते रिकामे करण्याचा आदेश दिला.

मनोज जरांगे यांचे भावनिक आवाहन…

न्यायालयाच्या निर्णयानंतर आंदोलकांना उद्देशून जरांगे म्हणाले, “मला घोट-घोट पाणी पिऊन तुमच्याशी बोलावं लागत आहे, मग तुमचा उपयोग काय? मुंबईकरांना त्रास होईल असं कुणी वागू नका. तुमच्या गाड्या मैदानात लावा, मैदानातच झोपा. कुणाचं ऐकून गोंधळ घालायचा असेल तर निघून जा.”

त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केले की, “मी मेलो तरी या मैदानातून उठणार नाही. पण तुम्ही नियमांचे पालन करा. मराठ्यांचा गर्व वाटेल असे वागा. मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे.”

पत्रकारांवरील त्रासाचा मुद्दा…

काही आंदोलकांनी महिला पत्रकारांना त्रास दिल्याच्या तक्रारी आल्यावर जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “अंतरवाली सराटीमध्ये हाच जमाव होता, तिथं काही त्रास झाला नाही. पण मुंबईत पत्रकारांना त्रास दिला जातोय, यामागे काही षड्यंत्र असावं,” असा संशय त्यांनी व्यक्त केला.

नियमपालनावर भर…

जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेने व शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्याचा सल्ला दिला. “माझ्या सूचनांचं पालन करा, कुणाला त्रास होणार नाही असं वागा. आंदोलनाचा उद्देश समाजाच्या हक्कासाठी आहे, तो कुठल्याही परिस्थितीत बदनाम होऊ नये,” असे ते म्हणाले.

या घडामोडींनंतर दोन दिवसांत आंदोलकांचा प्रतिसाद काय असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Editer sunil thorat 

 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??