मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांना भेट…
“श्री गणेश सर्वांना सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो; सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात” ; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रार्थना...

पुणे : राज्यातील मानाचे गणपती व पुण्यातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना करत “गणपतीने सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. सर्वांना सुबुद्धी देवो आणि सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो,” अशी इच्छा व्यक्त केली.
मानाच्या गणपती मंडळांना भेट…
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,
लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ,
साई गणेश मित्र मंडळ, साने गुरुजी तरुण मंडळांना भेट दिली. त्यांनी दर्शन घेत आरती केली. यावेळी विविध मंडळांच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.
नाना पाटेकरांच्या घरी गणेशदर्शन…
यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. श्री. पाटेकर यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.
मान्यवरांची उपस्थिती…
या भेटीप्रसंगी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, लोकमान्य टिळक मंडळाचे उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने, साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध मंडळांचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.
Editer sunil thorat







