
तुळशीराम घुसाळकर
पुणे (हवेली) : गणेशोत्सव काळात मोठ्या आवाजात वाजवल्या जाणाऱ्या डीजे व बँडमुळे नागरिकांना त्रास होत असल्यास तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधा, अशी माहिती व जाहिर आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे. तक्रार आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात येईल व तक्रारदाराचे नाव पुर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले…
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) पुणे शहर पोलीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश दिले आहेत की,
गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत.
सणानंतर नियमांचे पालन झाले की नाही, याचा सविस्तर अहवाल सादर करावा.
मंडळांच्या ठिकाणी आवाजाची पातळी (डेसिबल मोजमाप) करण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथे डीजे व बँडसाठी मर्यादा…
न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भात डेसिबल मर्यादा निश्चित केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे असतील…
औद्योगिक क्षेत्र : दिवसा ७५ dB, रात्री ७० dB
वाणिज्य क्षेत्र : दिवसा ६५ dB, रात्री ५५ dB
निवासी क्षेत्र : दिवसा ५५ dB, रात्री ४५ dB
शांतता झोन : दिवसा ५० dB, रात्री ४० dB
तर रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक वापरण्यास संपूर्ण बंदी आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार ; वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे…
शासकीय नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे / बँड वाजवणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल.
पर्यावरण मंत्रालयाच्या १६ ऑगस्ट २००० च्या निर्णयानुसार ध्वनिवर्धक वापरण्यावर निर्बंध आहेत.
ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास खालील प्रमाणे शिक्षा होऊ शकते…
५ वर्षांपर्यंत कारावास किंवा
१ लाख रुपयांपर्यंत दंड
किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील नागरिकांना आवाहन…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी नागरिकांना आवाहन केले की, डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्यास अजिबात घाबरू नका. तात्काळ ११२ वर कॉल करून तक्रार नोंदवा. तुमची ओळख पोलीसांकडुन गोपनीय ठेवली जाईल.
Editer sunil thorat




