
पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील कवडी माळवाडी (घाडगे वस्ती) दिनांक 02 सप्टेंबर 2025 रोजी शितळादेवी मित्र मंडळ व पुणे ब्लड बँक, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात 70 पेक्षा जास्त नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजासाठी अमूल्य योगदान दिले.
या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष गणेश नामदेव घाडगे यांच्या हस्ते झाले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, त्याच भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते रूपेश घाडगे, रवि साळुंखे, रूषी विचारे, सोमनाथ रणदिवे, साहिल घाडगे, बाबा घाडगे, आशिष घाडगे, सुमित घाडगे, रोहित घाडगे, निलेश घाडगे, संतोष घाडगे, सचिन घाडगे यांनी परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिरासाठी पुणे ब्लड बँक, हडपसर येथील डॉ. जानवी, डॉ. ऋषीव व त्यांची तज्ज्ञ टीम उपस्थित होती. त्यांनी रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पार पाडली.
यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते व मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. “समाजासाठी केलेला हा उपक्रम खरंच प्रेरणादायी असून, रक्तदानातून असंख्य जीव वाचवता येतात,” असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शितळादेवी मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली असून, पुढील काळातही अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.
Editer sunil thorat






