
पुणे (हवेली) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आयोजित होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदाही एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाने बाजी मारत सलग दुसऱ्यांदा करंडक पटकावला. व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या अंतिम फेरीत एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील महाविद्यालय यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यात एमआयटी एडीटी विद्यापीठाने सरशी करत विजेतेपद आपल्या नावे केले.
ही स्पर्धा दोन वयोगटांत — २५ ते ६० आणि ६१ प्लस — पार पडली. मराठी, हिंदी तसेच गझल-सुफी या गटांमध्ये एकूण २५ स्पर्धकांनी अंतिम फेरीत सहभाग घेतला होता.
विजेत्यांना करंडक प्रदान करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त (गुन्हे अन्वेषण) पंकज देशमुख, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड उपस्थित होते.
हा करंडक पटकावल्यानंतर माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. अतुल पाटील यांनी विजेत्या संघाचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
Editer sunil thorat




