शिक्षक आयुष्याचे खरे शिल्पकार! – डॉ. प्रफुल्ल आडकर ; जे.एस.पी.एम. डी. फार्मसी कॉलेजचा शिक्षक दिन उत्साहात साजरा…

हडपसर (पुणे) : जे.एस.पी.एम. डी. फार्मसी कॉलेजमध्ये सोमवार, दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी जयवंतराव सभागृहात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “शिक्षक आयुष्याचे खरे शिल्पकार!” या विषयावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. खुशाल मुंडे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात डी. फार्मसीच्या नवतरुण विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता आणि सादरीकरणांद्वारे शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले. विशेषतः एका नाटिकेत ग्रामीण भागातील शिक्षकाचा संघर्ष आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्याचा प्रवास हृदयस्पर्शीपणे सादर केला गेला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “शिक्षक हे केवळ शिक्षण देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया घालतात. तेच खरे जीवनाचे शिल्पकार आहेत. शिक्षक दिन ही केवळ एक तारीख नसून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना वंदन करण्याची एक संधी आहे.”
विद्यार्थ्यांच्या भाषणांतून शिक्षकांच्या कष्टाचे, त्यागाचे आणि मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रगती लगदिवे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पायल शेळके हिने केले, तर आभारप्रदर्शन अनिका देशमुख हिने केले.
कार्यक्रमाला प्रा. अनुराधा पाटील, प्रा. स्वप्निल गाडेकर, प्रा. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. सागर सोनार, प्रा. चेतन ममडगे यांच्यासह विवेक थोरात, स्वाती माकोने, रूपाली शिंदे, प्रतीक्षा थोरात, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, पांडुरंग पवार, कल्पना सुरवसे, कोमल चांदणे यांनी सहकार्य केले.
शिक्षकांच्या योगदानाची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण ठरला.
Editer sunil thorat






