ग्राहकांसाठी दिलासा… लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त; हिंदुस्तान युनिलिव्हरची नवी किंमत यादी जाहीर…

मुंबई : जीएसटी कपातीचा थेट फायदा आता सामान्य ग्राहकांना मिळणार आहे. देशातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने रोजच्या वापरातील साबण, शाम्पू, कॉस्मेटिक्सपासून ते पेय पदार्थांपर्यंतच्या उत्पादनांच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डव, क्लिनिक प्लस, सनसिल्क, लाईफबॉय, लक्स, क्लोजअप, हॉर्लिक्स, ब्रू यांसारखी लोकप्रिय उत्पादने आता ५ रुपयांपासून ते तब्बल ९० रुपयांपर्यंत स्वस्त होणार आहेत. ही नवी उत्पादने लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत.
कोणत्या उत्पादनांच्या किंमती कमी झाल्या?
डव शाम्पू (३४० मिली) : ४९० वरून ४३५ रुपये (५५ रुपयांची बचत)
हॉर्लिक्स (२०० ग्रॅम जार) : १३० वरून ११० रुपये (२० रुपयांनी स्वस्त)
किसान जॅम (२०० ग्रॅम) : ९० वरून ८० रुपये (१० रुपयांनी स्वस्त)
लाईफबॉय साबण (७५ ग्रॅम X ४) : ६८ वरून ६० रुपये (८ रुपयांची बचत)
क्लिनिक प्लस शाम्पू (३५५ मिली) : ३९३ वरून ३४० रुपये (५३ रुपयांनी स्वस्त)
सनसिल्क ब्लॅक साइन शाम्पू (३५० मिली) : ४३० वरून ३७० रुपये (६० रुपयांची बचत)
लक्स साबण (७५ ग्रॅम X ४) : ९६ वरून ८५ रुपये (११ रुपयांनी स्वस्त)
क्लोजअप टूथपेस्ट (१५० ग्रॅम) : १४५ वरून १२९ रुपये (१६ रुपयांची बचत)
लॅक्मे ९ टू ५ पीएम कॉम्पॅक्ट (९ ग्रॅम) : ६७५ वरून ५९९ रुपये (७६ रुपयांनी स्वस्त)
किसान केचप (८५० ग्रॅम) : १०० वरून ९३ रुपये
हॉर्लिक्स वुमन (४०० ग्रॅम) : ३२० वरून २८४ रुपये (३६ रुपयांनी स्वस्त)
ब्रू कॉफी (७५ ग्रॅम) : ३०० वरून २७० रुपये (३० रुपयांची बचत)
नॉर टोमॅटो सूप (६७ ग्रॅम) : ६५ वरून ५५ रुपये (१० रुपयांनी स्वस्त)
बूस्ट (२०० ग्रॅम) : १२४ वरून ११० रुपये (१४ रुपयांनी स्वस्त)
ग्राहकांसाठी दिलासा…
HUL च्या या घोषणेने महागाईत त्रस्त असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. साबण, शाम्पू, टूथपेस्ट, कॉफी आणि हेल्थ ड्रिंक यांसारख्या दैनंदिन वस्तूंच्या किंमती कमी झाल्याने घरखर्चावरचा भार थोडासा हलका होणार आहे.
Editer sunil thorat



