जिल्हासामाजिक

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नवी दिशा ; करिअर संसद शपथविधी सोहळ्याने भरला उत्साह…

तरुण नेतृत्वाचे सशक्त पाऊल ; महाविद्यालयात करिअर संसद शपथविधी सोहळा पार पडला...

पुणे (हडपसर) : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णा साहेब मगर महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त करिअर ससंदेतील पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी पदाधिकाऱ्यांना मागदर्शन केले. मुख्यमंत्री ऋषिकेश दिलीप सुतार, नियोजन मंत्री तेजस संभाजी गायकवाड, कायदे व शिस्त पालन मंत्री ओमकार शिवले, सामान्य प्रशासन मंत्री आयशा शर्मा, माहिती व प्रसारण मंत्री अक्षय स्वामी, उद्यायोजकता विकास मंत्री राहिल शेख, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री शिवम जाधव, कौशल्य विकास मंत्री शितल कुऱ्हाडे, संसदीय कामकाज मंत्री हेमंत विश्वासे, महिला व बालकल्याण प्राची अमराळे या विद्यार्थ्यांची मंत्री पदाची शपथ घेतली.

करिअर कट्टा या उपक्रमामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रुची व सहभाग वाढावा तसेच त्यांच्या करिअर विषयी दृष्टीकोना मध्ये जास्तीत जास्त स्पष्टता यावी या उद्देशाने करिअर संसदेची स्थापना केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य वाढीस लागावे तसेच महाविद्यालयात उपलब्ध होत असलेल्या रोजगार व नोकरीच्या संधी, स्पधी परिक्षा मार्गदर्शन तसेच करिअर कट्ट्या अंतर्गत घेत असलेल्या विविध कोर्सची व प्रशिक्षणाची माहिती महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यां पर्यंत पोहचावी या उद्देशाने करिअर संसद कार्यरत असते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सदस्य व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन करून भावी वाटचालीसाठी नूतन विद्यार्थी मंत्री मंडळास शुभेच्छा देऊन मंत्री मंडळाचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रशांत मुळे, डॉ शुभांगी औटी, डॉ गंगाधर सातव, प्रा.अनिल जगताप करिअर कट्टा समन्वयक डॉ.निता कांबळे करिअर कट्टा समिती सदस्य डॉ सुनिल वाघमोडे प्राआशा माने,प्रा. महेश्वरी जाधव प्रा.उर्मिला धनगर प्रा.दिपाली माळी , डॉ शीतल जगताप व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक करिअर कट्टा समन्वय डॉ.निता कांबळे यांनी केले आभार प्रा. आशा माने यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा दिपाली माळी यांनी केले.

मुख्य संपादक श्री सुनिल थोरात 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??