पेठ वडगावातून अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; आई-वडिलांचे स्वराज्याला घरी परत येण्याचे आवाहन…

कोल्हापूर (दि. 12 ऑगस्ट) : पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथील वाठार वडगाव रोड, अशोकराव माने कॉलेज पाठीमागे रहिवासी स्वराज योगेश चव्हाण हा अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडून हरवला आहे.
स्वराज याची आई शितल योगेश चव्हाण व वडील योगेश चव्हाण यांनी सांगितले की, दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी तो घरातून निघून गेला असून आतापर्यंत परतला नाही. मुलगा परत न आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्वराज याचे आई-वडील, भाऊ व बहीण यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सामाजिक माध्यमांतूनही वडील-आईने आवाहन केले असून, “स्वराज्या, लवकर घरी परत ये… कुटुंब तुझी वाट पाहत आहे,” असे भावनिक शब्दांत त्यांनी सोशल मीडियावरून आवाहन केले आहे.
दरम्यान, या संदर्भात पेठ वडगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून तपास इन्स्पेक्टर अनिता पवार यांच्या कडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हरवलेल्या मुलाबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
स्वराज सापडल्यास त्वरित मोबाईल क्रमांक 7798535253 / 9175431818 किंवा पेठ वडगाव पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Editer sunil thorat



