२० वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२५ दिमाखात संपन्न ; विजेत्या संघांचा गौरव…

पुणे (दि. १९ सप्टेंबर) : राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. २, पुणे येथील अलंकारन हॉलमध्ये आज सायंकाळी ५.१५ वाजता २० वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२५ चा समारोप सोहळा दिमाखात पार पडला. या समारंभास महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
समारंभात बँड पथकाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या २६ संघांनी शिस्तबद्ध संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली व मेळाव्याविषयी माहिती सादर केली.
फिरते चषक व स्पर्धा विजेते संघ…
👉🏻सायंटीफीक एड टू इन्व्हेस्टिगेशन : नागपूर शहर
👉🏻पोलीस फोटोग्राफी : कोल्हापूर परिक्षेत्र
👉🏻पोलीस व्हिडिओग्राफी : एस.आर.पी.एफ. परिक्षेत्र
👉🏻संगणक सजगता : कोल्हापूर परिक्षेत्र
👉🏻श्वान स्पर्धा : अमरावती परिक्षेत्र व गडचिरोली परिक्षेत्र
👉🏻घातपात विरोधी तपासणी : एम.आय.ए.
👉🏻कै. अशोक कामटे फिरता चषक : एम.आय.ए.
👉🏻सीसीटीएनएस बेस्ट घटक परफॉर्मन्स ट्रॉफी : सांगली, नाशिक ग्रामीण, मुंबई पूर्व विभाग
👉🏻मेळाव्यातील सर्वोत्कृष्ट व सर्वसाधारण विजेता संघ : नागपूर शहर
👉🏻सर्वसाधारण उपविजेता संघ : कोल्हापूर परिक्षेत्र
👉🏻गुन्हे अन्वेषण विभागाचा शताब्दी फिरता चषक : नागपूर शहर
प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन…
प्रमुख पाहुण्या श्रीमती रश्मि शुक्ला यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या,
“या स्पर्धांमधून केवळ शारीरिक ताकद किंवा शस्त्रकौशल्य नव्हे तर धैर्य, सजगता आणि जनतेसाठी तत्पर सेवाभाव अधोरेखित झाला आहे. मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा व संघभावना हे महाराष्ट्र पोलीस दलाचे बळ आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हा आपला मुलमंत्र लक्षात ठेवून समाजात विश्वास, शांती आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात.”
त्यांनी पुढे जाहीर केले की, ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा महाराष्ट्र पोलिसांच्या यजमानपदाखाली होणार आहे. “महाराष्ट्र पोलीस दलाने मागील अखिल भारतीय मेळाव्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. याही वेळी संस्मरणीय कामगिरी होईल, असा मला विश्वास आहे,” असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर अधिकारी…
समारोप समारंभास महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये :
👉🏻 दत्ता पडसलगीकर, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
👉🏻 सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, म. राज्य, पुणे
👉🏻 अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर
👉🏻 दिपक पांडे, अपर पोलीस महासंचालक, संचालक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, म. राज्य, पुणे
👉🏻 सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
👉🏻 राजेंद्र डहाळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, रा.गु.अ.के., गु.अ.वि., म. राज्य, पुणे
👉🏻 शशिकांत महानवर, पोलीस सहआयुक्त, पिंपरी-चिंचवड शहर
👉🏻 रंजनकुमार शर्मा, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर
👉🏻 श्रीमती शारदा राऊत, अंमली पदार्थ विरोधी पथक, म. राज्य, मुंबई
👉🏻 सुधीर हिरेमठ, विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे-पश्चिम, गु.अ.वि., म. राज्य, पुणे
👉🏻 विजयकुमार मगर, पोलीस उपमहानिरीक्षक, एस.आर.पी.एफ., पुणे
👉🏻 एम. रामकुमार, संचालक, एम.आय.ए., पुणे
👉🏻 डॉ. बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक, आगुशा, गु.अ.वि., म. राज्य, पुणे
👉🏻 अमोघ गावकर, पोलीस उपमहानिरीक्षक, प्रशासन, गु.अ.वि., म. राज्य, पुणे
👉🏻 श्रीमती तेजस्विनी सातपुते, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १, पुणे
👉🏻 संदीपसिंह गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
👉🏻 पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक, आगुशा, गु.अ.वि., म. राज्य, पुणे
👉🏻 सौरभ अगरवाल, पोलीस अधीक्षक, पुणे पथक, गु.अ.वि., म. राज्य, पुणे
👉🏻 श्रीमती स्वप्ना गोरे, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. २, पुणे
👉🏻 श्रीमती पल्लवी बर्गे, पोलीस अधीक्षक, का.व सं., गु.अ.वि., पुणे
यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कुटुंबीय तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोप व आभार प्रदर्शन…
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेंद्र डहाळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, (रा.गु.अ.के.), गु.अ.वि., म. राज्य, पुणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना कदम, पोलीस निरीक्षक, गु.अ.वि., पुणे शहर आणि सचिन देवडे, पोलीस नाईक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. २ यांनी केले.
Editer sunil thorat









