जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

रणसंग्रामाचा बिगुल वाजणार अखेर! सर्वोच्च न्यायालयाचा फर्मान ; ३१ जानेवारीपूर्वी मतदान अनिवार्य… वाचा सविस्तर…

मतदार ठरवणार जनतेचा खरा राजा...

पुणे : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अखेर निर्णय देत ३१ जानेवारी २०२६ पूर्वी मतदान पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षांपासून प्रशासकीय राजाखाली असलेल्या महापालिकांमध्ये पुन्हा लोकशाहीचा शंखनाद होणार असून आता फक्त बिगुल वाजण्याचीच प्रतिक्षा सुरू आहे.

कोरोनाकाळात पुढे ढकलल्या गेलेल्या आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या महापालिका निवडणुका अखेर टळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीला नऊ महिने उलटून गेले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष होता. मात्र आता न्यायालयाच्या आदेशामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान, तर शेवटच्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आचारसंहितेची चाहूल…

निवडणुका तीन टप्प्यांत होणार असून आधी जिल्हा परिषद, त्यानंतर नगरपालिका आणि शेवटी महापालिका निवडणुका होणार आहेत. यामुळे साधारण तीन ते सव्वा तीन महिने राज्यभर आचारसंहिता लागू राहील. निवडणुकीचे वेळापत्रक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्हे असून नवरात्रीपासूनच उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडण्याची लगबग सुरू होणार आहे.

प्रभागरचना आणि आरक्षण…

पालिकेने प्रारूप प्रभागरचना नगरविकास विभागाकडे पाठवली असून ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. नोव्हेंबरपूर्वी मतदार याद्यांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू होईल.

पक्षनिहाय समीकरणे…

भाजप : माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कामगिरीचा आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गजर करून पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : अजित पवारांच्या गटफुटीनंतर पुण्यातील गढी वाचवण्याचे आव्हान.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : उपमुख्यमंत्री पदाचा थेट फायदा घेत विकासकामांच्या मुद्द्यांवर मोर्चेबांधणी.

शिवसेना (शिंदे गट व उद्धव गट) : अधिकृत सत्तेचा आधार विरुद्ध भावनिक लाट – अस्तित्वाची लढाई.

काँग्रेस : पारंपरिक मतदारवर्ग व सामाजिक संघटनांचा आधार पुन्हा एकदा आजमावणार.

मनसे : गळतीनंतर संघटना पुन्हा उभी करण्याचे मोठे आव्हान.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??