जिल्हामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला विजेच्या खांबावर असलेली अनाधिकृत इंटरनेट वायर अडकली, पण मोठा अनर्थ टळला..; सोरतापवाडी.

इंटरनेट केबल व टीव्ही केबल चालकांवर कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, लोणी काळभोर/उरुळीकांचन/लोणीकंद/यवत/थेऊर यांना पत्रव्यवहार ; म.भ.धाडवे उप कार्यकारी अभियंता. उरुळी कांचन...

पुणे (हवेली) : अनाधिकृतपणे महावितरणच्या पोल वरून ओढण्यात आलेल्या इंटरनेट केबल व टीव्ही केबल मालकांना वीज वितरण मार्फत कारवाई करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता म. भ. धाडवे यानी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला आहे.

पत्रव्यवहारात असे नमूद करण्यात आले आहे. की महावितरण कंपनीस कुठलीही पूर्व सूचना न देता महावितरण कंपनीच्या पोल वरून उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या इंटरनेट केबल व टीव्ही केबल अनधिकृतपणे ओढलेल्या आहेत. तरी परवानगी न घेता हायवे क्रॉसिंग, खेडोपाडी, गावठाण, रेसिडेन्सी भागात या प्रकारचे जाळे पसरलेले आहे. महावितरण कंपनीकडून केबल तोडून काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. या केबलच्या जाळल्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाठीमागच्या काळात इंटरनेट केबल व टीव्ही केबल पुरवठा करणाऱ्या कंपनीना सक्त ताकीद देऊन देखील परिस्थिती जेथे थे असुन केबल टाकण्याचे प्रमाण कमी न होता वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने केबल पोल वरुन ओढत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. यापुर्वी ही या संदर्भात पत्रव्यवहार झाले आहेत. तरी कारवाई होत नाही म्हणून असे खरमरीत पत्रव्यवहार संबंधित पोलीस ठाण्याशी करण्यात आला असल्याचे म.भ.धाडवे उप कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. उरुळीकांचन उपविभाग यांनी केले आहे.

वीज वितरणाच्या कारभारावर भले मोठे प्रश्न चिन्ह?..

सदरील घटनेच्या बाबतीत अशी माहिती मिळाली की आज पुणे सोलापूर महामार्गावर सोलापूरच्या दिशेने जाताना सोरतापवाडी येथे वाहन MH – 42 T 2320 या ट्रकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोड्यावर बसलेला पुतळा हायवेवरील महावितरणच्या खांबावर इंटरनेट व केबलच्या अनाधिकृत वायरला अडकला पण थोडक्यात अनर्थ टळला. या घटनेने वीज वितरणाचे अधिकारी खडबडून जागे झाले. आणि उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या पोलीस स्टेशनला कारवाईसाठी पत्र पाठवले. परंतू घटना घडायच्या आधी वीज वितरणाच्या अधिकारी यांनी कारवाई का केली नाही. महावितरण कंपनीचे अधिकारी अनाधिकृतपणे वीजेच्या खांबावर असणाऱ्या केबल वायर व इंटरनेट वायर धारकांवर मेहरबान का? आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय  सामान्य नागरिकांना पडला आहे. प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष.

उपकार्यकारी अभियंता यांचा पत्रव्यवहार

या संदर्भात कारवाईसाठी मा. पोलीस आयुक्त, महाराष्ट्रपोलीस, साधू वासवानी चौक, जीपीओ ऑफिसच्या पाठीमागे, पुणे, मा. कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या, मुळशी विभाग, शाखा अभियंता, उरुळीकांचन शहर /उरुळीकांचन ग्रामीण / थेऊर/लोणीकाळभोर/कुंजीरवाडी ठिकाणी उपकार्यकारी अभियंता म.भ.धाडवे यांनी पत्रव्यवहार केला आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??