कटरिना कैफ 42 वर्षांत आई होणार ; प्रेग्नन्सीच्या जोखमींचा सविस्तर माहिती वाचा…

मुंबई : बॉलीवुडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी कटरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. कटरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बेबी बंपसह गोंडस फोटो शेअर करून चाहत्यांना प्रेग्नन्सीची आनंदाची बातमी दिली आहे.
सध्या 42 वर्षांची असलेली कटरिना या वयात गर्भवती आहे, ज्यामुळे तज्ज्ञांच्या मते ही प्रेग्नन्सी तांत्रिकदृष्ट्या रिस्की ठरू शकते. वयाच्या 40 नंतर बाळ जन्माला आणणे शरीरासाठी आव्हानात्मक असते आणि अनेक प्रकारच्या आरोग्य धोके उद्भवू शकतात.
वय 40 नंतर प्रेग्नन्सीमध्ये येणाऱ्या मुख्य जोखमी…
1. गर्भपाताची शक्यता वाढते: 35 वर्षांनंतर गर्भपाताची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. वय वाढल्याने अंड्यांची गुणवत्ता कमी होते आणि गर्भधारणेची प्रक्रिया अधिक संवेदनशील होते.
2. ब्लड प्रेशर आणि डायबिटीज: 40 नंतर महिलांचे वजन वाढते आणि हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण येतो. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर आणि डायबिटीज होण्याचा धोका वाढतो.
3. डिलिव्हरीची आव्हाने: या वयात नॉर्मल डिलिव्हरी करणे कठीण ठरते. त्यामुळे सी-सेक्शन करावी लागते, जी काही प्रकरणांमध्ये जास्त रिस्की ठरू शकते.
4. बाळातील आजारांचा धोका: वयाच्या 40 नंतर जन्माला येणाऱ्या बाळात जेनिटिक आजार, डाऊन सिंड्रोम, मेंटल डिसऑर्डर किंवा थायरॉईडसारखे आजार येण्याची शक्यता अधिक असते. तज्ज्ञांच्या मते, 150 बाळांपैकी एका बाळाला काही प्रकारचे आजार उद्भवू शकतात.
तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक…
वय 30 च्या आत बाळ घेणे फायदेशीर: डॉक्टरांचा असा सल्ला आहे की, शक्य असल्यास महिलांनी 30 वर्षांपूर्वी बाळ घेणे फायदेशीर ठरते.
40 नंतर गर्भधारणा झाल्यास काळजी घेणे आवश्यक:
पुरेशी झोप घेणे
संतुलित आहार घेणे
मानसिक ताण कमी करणे
नियमित वैद्यकीय तपासणी करणे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, योग्य काळजी घेतल्यास वय जास्त असतानाही सुरक्षित प्रेग्नन्सी शक्य आहे, परंतु प्रत्येक प्रकरण वैयक्तिक आरोग्य परिस्थितीवर अवलंबून असते.
टीप : ही माहिती केवळ सामान्य माहितीकरिता आहे. वैयक्तिक आरोग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांचा मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे.
Editer sunil thorat





