पुणे जिल्ह्यात सेवा हमी पंधरवड्यात ८ हजाराहून अधिक रस्त्यांचे सर्वेक्षण : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी…

पुणे, (दि.२३) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यादरम्यान जिल्ह्यातील ८,७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण आज अखेर पूर्ण झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, या पंधरवड्यादरम्यान रस्त्यांचे सर्वेक्षण, सांकेतांक निश्चित करणे, शेतरस्त्यांचे मोजणी व संमतीपत्र घेणे या कामावर भर देण्यात आला. त्यांनी सांगितले की या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना रस्त्यांबाबत अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा मिळेल.
तालुक्यांनिहाय रस्त्यांचे सर्वेक्षण…
जुन्नर: २,९८६
पुरंदर: २४०
वेल्हा: ३७९
भोर: ३२१
बारामती: ३०८
इंदापूर: १५६
आंबेगाव: १,९९६
शिरुर: १,०७७
खेड: १५९
मावळ: २७३
मुळशी: २८२
हवेली: १६५
पिंपरी-चिंचवड: ५
लोणी काळभोर: १८५
दौंड: २३८
यामुळे एकूण ८,७७० रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे…
पाच हजाराहून अधिक रस्त्यांचे सांकेतांक निश्चित…
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, ५,०७१ रस्त्यांचे सांकेतांक निश्चित करण्यात आले आहेत, जे रस्त्यांच्या ओळखी आणि देखभालीसाठी महत्त्वाचे आहेत.
तालुक्यांनिहाय सांकेतांक निश्चित रस्त्यांची संख्या…
जुन्नर: ३,५५६
पुरंदर: ८
वेल्हा: ५
भोर: ९७
बारामती: ११
इंदापूर: १५६
आंबेगाव: ४५
शिरुर: ९३६
खेड: ७३
मावळ: ४
मुळशी: ४
हवेली: ४
पिंपरी-चिंचवड: ५
लोणी काळभोर: ८
दौंड: १५९
रस्ता लोकअदालतीत शेतरस्त्यांबाबत निकाली…
शेतकऱ्यांसाठी उपलब्ध रस्त्याबाबत रस्ता लोकअदालतीचे आयोजन करून ८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तालुक्यांनिहाय निकाली काढलेली प्रकरणे:
जुन्नर: ४
पुरंदर: ८
वेल्हा: ७
भोर: ६
बारामती: ११
आंबेगाव: २९
शिरुर: ८०
खेड: ११
मावळ: १२
मुळशी: १२
हवेली: १५
दौंड: ९
यामुळे शेतकऱ्यांच्या रस्त्यांशी संबंधित वाद सोडवण्यास मोठी मदत झाली आहे.
शेतरस्त्यांची मोजणी व संमतीपत्र…
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, शेतीसाठी रस्ता उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधितांकडून २६५ संमतीपत्र घेण्यात आले असून, एकूण ४१४ शेतरस्त्यांची मोजणी व सिमांकन करण्यात आले आहे.
या मोहिमेमुळे जिल्ह्यातील रस्ते व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित होणार असून शेतकऱ्यांना शेतरस्त्यांचा अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित वापर करता येईल.
Editer sunil thorat



