जिल्हादेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

1 सप्टेंबर पासून नवे वाहतूक नियम लागू ; दंडात १० पट वाढ… सविस्तर वाचा…

नवी दिल्ली : रस्ते अपघातांवर नियंत्रण आणणे आणि वाहतूक शिस्त काटेकोरपणे पाळली जावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. हे नवे नियम १ मार्च २०२५ पासून संपूर्ण देशभर लागू झाले असून, नियमभंग करणाऱ्यांवर दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा दहा पट वाढवण्यात आली आहे.

नवे बदल आणि कारवाई…

दंड रकमेतील वाढ : वाहतूक नियम मोडल्यास आता अधिक दंड आकारला जाणार आहे.

ई-चलन प्रणाली : पोलिसांकडून ई-चलन मशीन व सीसीटीव्हीच्या साहाय्याने थेट कारवाई. चलन थेट वाहनमालकाच्या मोबाईल व ई-मेलवर.

लायसन्स निलंबन : दारू पिऊन गाडी चालवणे किंवा गंभीर उल्लंघन झाल्यास लायसन्स ३ महिन्यांसाठी निलंबित.

अल्पवयीन चालकांवर कडक कारवाई : १८ वर्षाखालील व्यक्ती गाडी चालवत असल्यास पालक/वाहनमालकास ₹२५,००० दंड आणि ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास.

महत्वाचे नियम उल्लंघन जुना दंड नवा दंड…

–हेल्मेट न घालणे जुना दंड ₹100 नवीन दंड ₹1,000 + ३ महिने लायसन्स जप्त
–सीट बेल्ट न लावणे जुना दंड ₹100 नवीन दंड ₹1,000
–सिग्नल तोडणे जुना दंड ₹500 नवीन दंड ह₹5,000
–धोकादायक वाहनचालक जुना दंड ₹500 नवीन दंड ₹5,000
–लायसन्सशिवाय वाहन जुना दंड ₹500 नवीन दंड ₹5,000
— दारू पिऊन वाहन जुना दंड ₹1,000 -₹1,500 नवीन दंड ₹10,000 + ६ महिने तुरुंगवास
–विमा नसलेले वाहन जुना दंड ₹200-₹400 नवीन दंड ₹2,000

ई-चलन भरण्याची प्रक्रिया…

1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या – echallan.parivahan.gov.in

2. तपशील भरा – वाहन क्रमांक किंवा चलन क्रमांक टाका.

3. ऑनलाईन पेमेंट – डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे दंड भरा.

4. पोचपावती मिळवा – भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.

नागरिकांना संदेश…

सरकारने केलेले हे बदल केवळ दंड वाढवण्यासाठी नसून, रस्ते सुरक्षित ठेवणे आणि अपघातांची संख्या कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??