
पुणे : पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मतदारसंघातील गंभीर व दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मांडून नागरिकांच्या हितासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली.
बैठकीत मांडण्यात आलेले प्रमुख प्रश्न…
वाघोलीतील मॅजेस्टिक ओएसिस सोसायटीच्या समस्या
हडपसर विधानसभा मतदारसंघातील घनकचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न
हडपसर बायो एनर्जी प्रकल्पातील अनियमितता
मांजराईनगर परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेतील त्रुटी
स्वच्छता व पायाभूत सुविधांचा अभाव
मुंढवा परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मंजूर पोर्टेबल आरोग्यवर्धिनी केंद्रांची सद्यस्थिती
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील होर्डिंग सुरक्षेबाबत उपाययोजना
वृक्षतोड व पर्यावरणीय हानी
संसद सदस्यांना माहिती देण्यात होणारी टाळाटाळ
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका…
डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा हे प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. त्यामुळे तातडीने ठोस पावले उचलली पाहिजेत.”
प्रशासनाची प्रतिक्रिया…
या चर्चेला प्रतिसाद देताना आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या हिताच्या प्रश्नांवर कोणतीही टाळाटाळ होऊ नये याबाबत प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले.
निष्कर्ष…
शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतल्यामुळे या समस्यांकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat





