शिवरायांचे दुर्गवैभव आता जागतिक ठेवा!, सविस्तर माहिती वाचा…

पुणे : युनेस्कोने ११ जुलै २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी किल्ला ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता दिली.
महाराष्ट्राचा अभिमान, जगाचा ठेवा!
महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचे जगभरातले महत्त्व अधोरेखित झाले आहे. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी निगडित रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांना ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले.
ऐतिहासिक प्रयत्नांमुळे मिळाली मान्यता…
–या मान्यतेमागे केंद्र व राज्य शासनाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरला.
–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा
–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निर्णायक भूमिका
–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची साथ
–सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी युनेस्को मुख्यालयात जाऊन तांत्रिक सादरीकरण केले
–भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा, अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक हेमंत दळवी यांचे मोलाचे योगदान
स्वराज्याच्या जिवंत साक्षीदार किल्ल्यांची थोडक्यात ओळख…
रायगड – महाराजांची राजधानी, राज्याभिषेकाचे पवित्र स्थळ
राजगड – स्वराज्य स्थापनेची पहिली राजधानी
प्रतापगड – अफजलखान वधाचे रणांगण
पन्हाळा – पावनखिंडीतील बाजीप्रभूंचे शौर्य अमर केलेला किल्ला
शिवनेरी – शिवरायांचे जन्मस्थान
लोहगड – व्यापार मार्गांचे रक्षण करणारा किल्ला
साल्हेर – मराठ्यांनी मोगल सैन्याचा पराभव केलेले ऐतिहासिक युद्धस्थळ
सिंधुदुर्ग – समुद्रावर उभारलेला अजेय जलदुर्ग
विजयदुर्ग – मराठा नौदल सामर्थ्याचा केंद्रबिंदू
सुवर्णदुर्ग – हर्णे बंदराच्या सुरक्षेचा साक्षीदार
खांदेरी – मुंबई बंदरावर नजर ठेवणारा सागरी किल्ला
जिंजी (तामिळनाडू) – दक्षिणेचा जिब्राल्टर, राजाराम महाराजांची आसरा भूमी
जागतिक वारसा ठरल्याने होणारे फायदे…
—जागतिक स्तरावर संरक्षणासाठी निधी व तांत्रिक मदत मिळणार
—सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्वाला अधोरेखित मान्यता
—पर्यटनाला चालना मिळणार
—युवा पिढीपर्यंत स्वराज्याची खरी जाणीव पोहोचणार
शिवभक्तांसाठी अभिमानाचा क्षण…
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे फक्त दगडमातीचे बांधकाम नाहीत, ते मराठी अस्मितेचे जिवंत प्रतीक आहेत. आता ही अस्मिता जगभरात पोहोचली आहे.“शिवकाल फक्त आठवणीत नाही,त








