सोरतापवाडीत तिहेरी अपघात; पिकअपमधील सळई घुसल्या स्कूल बसमध्ये; सुदैवाने जीवितहानी टळली!
स्कूल बस वाहतूक नियमांचे उल्लंघन स्पष्ट; पोलिस व RTO विभाग तपासात...

उरुळी कांचन (पुणे) : पुणे–सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) बुधवारी (ता. 08 ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत भीषण तिहेरी अपघात झाला. ‘ऑलिंपस स्कूल ऑफ एक्सलन्स’च्या बसला लोखंडी सळई वाहतूक करणाऱ्या गुरुदत्त सेल्स कॉर्पोरेशनच्या पिकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात सळई थेट बसच्या पाठीमागे घुसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी नियमबाह्य वाहतुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार भांडगाव येथील “ऑलिंपस स्कूल ऑफ एक्सलन्स” शिक्षण संस्थेच्या बसचा सोरतापवाडी हद्दीतील कांबळे बस स्टॉप येथे अपघात घडला ही बस थेऊर फाट्यावर उरुळी कांचनच्या दिशेने चालली होती. कांबळे बस स्टॉप जवळ आल्यानंतर अनाधिकृत पणे फोडलेल्या डिव्हाडर मधुन बसला दुचाकी आडवी आल्याने बस चालकाने अचानक ब्रेक लावला असता पाठीमागून गज भरुन वाहून नेण्यार्या पिकअपने स्कुल बसला जोरदार धडक दिली त्यानंतर पिकअपमधील लोखंडी गज बसमध्ये आठ ते दहा फुट काच फोडून आत शिरल्या काचेचे तुकडे विद्यार्थी व मावशी यांना डोक्यात लागले. मागील बाजूस येणाऱ्या हायवाने पिकअपला धडक दिल्याने तिहेरी अपघात घडल्याची घडना दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
वडाचीवाडी पेठ (ता. हवेली) येथील ७० वर्षीय मोटारसायकल चालक विठ्ठल रघुनाथ चौधरी यांचा गंभीर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर येथील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विठ्ठल चौधरी हे आपल्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना हा अपघात घडल्याची नागरिकांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदत करत त्यांना रुग्णवाहिकेतून तातडीने विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. अर्धा तास उलटूनही पोलीस प्रशासन न पोचल्याने वाहतूक ठप्प झाली. व घडना स्थळी नागरिकानी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यादरम्यान उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
स्कूल बस नियमांचे उल्लंघन स्पष्ट ; जबाबदारी कोणाची?
शालेय वाहनांसाठी महाराष्ट्र राज्य मोटार वाहन अधिनियम व आरटीओचे विशिष्ट नियम आहेत –
1. आरटीओ मान्यता असलेले बस वाहनचालक व क्लीनर असणे बंधनकारक
2. बसवर “School Bus” अशी पिवळ्या रंगात नोंद असणे आवश्यक
3. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी योग्य आसनव्यवस्था व फायर एक्स्टिंग्विशर, फर्स्ट एड बॉक्स आवश्यक
4. बसची फिटनेस, विमा व पोलिस पडताळणी वैध असणे बंधनकारक
5. ठरावीक गतीमर्यादेचे पालन करणे व ओव्हरलोडिंग टाळणे गरजेचे
सोरतापवाडी अपघातानंतर RTOवर सवाल : नियमभंगामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!
पुणे–सोलापूर महामार्गावर बुधवारी तिहेरी अपघात; ऑलिंपस स्कूल बसला लोखंडी सळई वाहतूक करणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिली. सुदैवाने विद्यार्थ्यांचे जीवितहानी टळली. पोलीस तपास सुरू असून शाळा प्रशासन, बस चालक व पिकअप मालक यांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. नागरिकांचे म्हणणे: RTO दिवसा निष्क्रिय, “रात्रीस खेळ चाले” या तत्वावर कारवाई करत आहे. अपघातानंतरही RTO संकुल बसवर कारवाई करणार का हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. अवैध वाहतुकीतील निष्काळजीपणा आणि नियमभंगामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका. नागरिक आणि पालक त्वरित कारवाईची मागणी करत आहेत.
स्थानिक नागरिकांची मागणी…
“महामार्गावर स्कूल बस व अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक थांबवण्यासाठी आरटीओ व महामार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात आली आहे.
Editer sunil thorat





