पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी ८ हजार ३१६ शाळांनी नोंदणी केली असून एकुण १ लाख १ हजार ४७४ प्रवेशाच्या जागांची नोंदणी झालेली आहे.
आरटीई अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये काही प्रवेश राखीव ठेवलेले असतात. यात प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर म्हणजेच डिसेंबर मध्येच सुरु करण्यात आली आहे. १८ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत शाळांच्यी नोंदणीसाठी आरटीई पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.
या मुदतीत पुरेशा शाळांनी नोंदणी केलीच नव्हती. शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही ही बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे ४ जानेवारी पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ही अंतिम मुदतवाढ असून दिलेल्या मुदतीत अपूर्ण काम राहिल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात राज्यातील एकूण ९ हजार १३८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी नोंदणी केली होती. त्यानुसार १ लाख २ हजार ४३४ जागा उपलब्ध झाल्या होत्या. य़ंदा अद्यापही काही शाळांनी नोंदणी केलेली नाही.
जिल्हानिहाय शाळा नोंदणी व कंसात प्रवेशाच्या जागा
अहिल्यानगर – ३४८(३२८७), अकोला – १८७ (१९८३), अमरावती – २१८ (२३८७), भंडारा – ८७ (८२७), बीड – १९९ (२०३७), बुलढाणा – २३० (२८१८), चंद्रपुर – १८३(१५१६), छत्रपती संभाजीनगर् – ५२६ (४०७६), धाराशीव – १०७ (११३७), धुळे – ९९ (११७७), गडचिरीली – ५६ (४७२), गोंदिया – १२३ (९७०), हिंगोली – ८७ (७९०), जळगाव् – २६८(३१६८), जालना – २९४ (२११८), कोल्हापुर – ३२८ (३२५३), लातुर – २०७ (२१७३), मुंबई – ३१४ (५८५७), नागपुर- ६३९ (६९६०), नांदेड- २३९ (२७२८), नंदुरबार – ४३ (३५९), नाशिक – ४०७ (५२९६), पालघ्रर – २७२(५१४२), परभणी – १५२(१३२५), पुणे – ७५८ (१४२७४), रायगड – १७० (३२९१), रत्नागिरी – ९० (७७२), सांगली – २१२(१९४४), सातारा – १७६(१४८९), सिंधुदुर्ग – ४५(२६७), सोलापुर – २७८(२५५१), ठाणे – ६०६ (१११४१), वर्धा – ११२(१२६६), वाशिम – ५९ (६५२), यवतमाळ – १९७ (१९७१).
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा