रात्री प्रवाशांची लूट करणारे रिक्षाचालक आणि विधीसंघर्षित बालक पकडले ; ३.७ लाखांचा ३० मोबाईलसह मुद्देमाल जप्त…
वानवडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी...

पुणे : प्रवाशांना रात्रीच्या वेळी जबरी चोरी करून लुटणाऱ्या रिक्षाचालक व दोन विधीसंघर्षित बालकांना वानवडी पोलिसांनी अटक करत ३,७०,२०० रुपयांचा एकूण ३० मोबाईलसह मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे शहरात वारंवार घडणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष मोहीम सुरू केली असून, त्याच अनुषंगाने वानवडी पोलिसांनी ही कारवाई केली.
तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अतुल गायकवाड व अमोल पिलाणे यांना माहिती मिळाली की, हडपसर येथील नवीन म्हाडा कॉलनी जवळ तीन इसम रिक्षा (क्रमांक एमएच १२ व्हीबी ९४२०) मध्ये थांबले असून चोरीचा मोबाईल विक्रीस ठेवले आहेत.
पोलिसांनी छापा टाकून फैजान मोहम्मद गौस शेख (रा. ऊरुळी देवाची) व दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्या रिक्षेतून एक विवो मोबाईल हॅन्डसेट व चाकू जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी पुणे स्टेशन परिसरातून एकट्या प्रवाशांना रिक्षेत बसवून भैरोबानाला परिसरात नेऊन चाकूचा धाक दाखवून लूट केली. या गुन्ह्यातील रिक्षा व मोबाईलसह एकूण ₹८०,१०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडून पुढील तपासात आणखी २९ मोबाईल फोन (₹२,९०,१०० किंमतीचे) जप्त करण्यात आले.
सदर आरोपीविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०६/२०२५, ४००/२०२५ आणि २९०/२०२१ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) व भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे नोंद आहेत.
ही कारवाई डॉ. राजकुमार शिंदे (उप-पोलीस आयुक्त, परिमंडळ ५), धन्यकुमार गोडसे (सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग) व विजयकुमार डोके (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तसेच पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे व महिला पोलीस अंमलदार सुजाता फुलसुंदर यांचा समावेश आहे.
Editer sunil thorat



