महाराष्ट्रावर मोठं संकट! पुढील पाच दिवस धोक्याचे ; आयएमडीचा मुसळधार पावसाचा इशारा…

मुंबई : महाराष्ट्रात मागील आठवडाभर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती, घरे आणि जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. अनेक शेतात पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.
दरम्यान, दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. हवामान विभागानं दिलेल्या नव्या अंदाजानुसार येत्या २५ ते २८ ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून, राज्यात अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसू शकतो.
हवामान विभागाकडून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकणातील रायगड तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा पट्टा राजस्थान आणि पंजाबच्या दिशेने सक्रिय होणार असून, त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होणार आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यांना सध्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं होतं. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाल्याने राज्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat






