प्रत्युषा बोराटे मृत्यूप्रकरणी शिंदे साहेबांकडून तातडीने कारवाईचे आदेश; सामाजिक कार्यकर्ते अभिजित बोराटे यांना दिले सहकार्याचे निर्देश…

मुंबई : प्रत्युषा बोराटे हिच्या मृत्यूप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते अभिजित बोराटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अभिजित बोराटे यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर शिंदे साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांना दूरध्वनीवरून विशेष सूचना दिल्या.
“आमच्या पक्षाचे प्रवक्ते अभिजित बोराटे तुम्हाला भेटायला येतील, त्यांना पूर्ण सहकार्य करावे,” असे स्पष्ट निर्देश एकनाथ शिंदे साहेबांनी विनयकुमार चोबे यांना दिले.
या प्रसंगी साहेब स्वतः बाहेरगावी असतानाही तातडीने मदत करणारे प्रमोद नाना भानगिरे यांच्या सहकार्याबद्दल अभिजित बोराटे यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
या घडामोडीनंतर प्रत्युषा बोराटे मृत्यूप्रकरणी तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Editer sunil thorat



