
संपादक सुनिल थोरात
पुणे (आंबेगाव) : ३१ मे २०२५ हा दिवस माझ्या आयुष्यात एक अविस्मरणीय सोहळा बनून आला. वडील शांताराम बाबुराव थोरात सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे, आणि माझी आई मंगल शांताराम थोरात यांचे ६० व्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे चिरंजीव डॉ राजेश थोरात यांनी सांगितले.
“पाऊलखुणा” वडिलांच्या साहित्यिक प्रवासाचे प्रतीक असलेला त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला. ३१ मे २०२५ हा दिवशी प्रकाशन सोहळ्यास दिलीप वळसे पाटील, विधानसभा आमदार, आंबेगाव शिवाजीदादा आढळराव पाटील अध्यक्ष, पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ / माजी खासदार, शिरूर लोकसभा यांची उपस्थिती हा सोहळा संपन्न झाला.
‘पाऊलखुणा’ या केवळ कविता नव्हे, तर त्यांचा अनुभव, भावना, आणि शब्दांमधून उमटलेले जीवनाचे अधिवाचन असल्याचे चिरंजीव डॉ राजेश थोरात यांनी सांगितले.
या ‘पाऊलखुणा’ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संतोष हराळे सहसंचालक, इतर मागास व बहुजन विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी भूषवले. तर या विशेष दिवशी प्रकाशन सोहळ्यास बाळासाहेब बेन्डे पाटील अध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, सुषमाताई शिंदे उपस्थित होते.
‘पाऊलखुणा’ या कविता संग्रहाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प. पालवे महाराज शास्त्रीजी आळंदी, राजेंद्र सगर काव्यमित्र प्रकाशन, पुणे हे उपस्थित होते. कविसंमेलन सादरीकरण देवेंद्र गावंडे, डॉ. संजय जगताप, प्रभु जाचक, श्रीराम घाडे आणि सविता जंगम यांनी केले.
या सोहळा हॉटेल रवीकिरण, एकलहरे यि ठिकाणी शनिवार, दि. ३१ मे २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात कळंब गावातील समस्त ग्रामस्थांनी दाखवलेली उपस्थिती आणि प्रेम आम्हाला कायमच ऋणी राहीन. आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि संस्काराने घडलेले हे प्रत्येक क्षण आमच्या जीवनाचा अमूल्य ठेवा असणारे आहे आणि तो जपण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे चिरंजीव डॉ राजेश थोरात, यांनी सांगितले. यावेळी पत्नी सुरेखा थोरात व प्रज्ञा व अविनाश चव्हाण यांनी यशस्वीपणे आयोजन केले.









