संविधानानुसार राज्य कारभार चालणारा भारत जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश ; दिलीप आबा तुपे.

पुणे (हडपसर) : संविधानानुसार राज्य कारभार चालणारा भारत जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे. आपण सर्व भारतीय नागरिकांनी भारतीय राज्यघटनेचे पालन करून स्वातंत्र्य व देशाची सार्वभौमता अबाधित राखण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर विविध क्षेत्रात ,स्पर्धा परीक्षा,खेळ व सांस्कृतिक बाबतीत यश मिळवावे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य दिलीप आबा तुपे यांनी केले. साधना विद्यालयात आयोजित ७६ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले.
यानंतर ध्वजास व पाहुण्यांना एन.सी.सी, आर.एस.पी. व स्काऊट छात्रांनी मानवंदना दिली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तंबाखू सेवन विरोधी प्रतिज्ञा प्रतापराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर गीत व लेझीम प्रात्यक्षिके सादर केली.
याप्रसंगी संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य अरविंद भाऊ तुपे, आयर्नमॅन ज्येष्ठ उद्योजक दशरथ जाधव, साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, एस.एम.जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.साळुंखे,उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, कन्या विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल तुळजापुरे, आईसाहेब फाऊंडेशनचे अनिल पाटील, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुशीर, मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते , पर्यवेक्षिका माधुरी राऊत, आजीव सभासद लालासाहेब खलाटे, आजीव सेवक अनिल मेमाणे, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे, गजेंद्र शिंदे, बालवाडी विभागप्रमुख इताले ताई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.तर ध्वजसंचलन R.S.P जिल्हा समादेशक रमेश महाडिक यांनी केले.कार्यक्रमाचे निवेदन अनिल वाव्हळ व रूपाली सोनावळे यांनी केले.




