शांततेचा नोबेल मारिया कोरिना मचाडो यांना ; ट्रम्पच्या स्वप्नाला धक्का!

वेनेज्युएला : यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार वेनेज्युएलातील मानवाधिकार कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून या पुरस्कारासाठी चर्चेत होते, परंतु ट्रम्पचा दावा पूर्ण होऊ शकला नाही.
नोर्वेच्या नोबेल समितीने सांगितले की, मारिया कोरिना मचाडो यांना लोकशाही अधिकारांची बाजू मांडण्यासाठी आणि शांततेच्या संघर्षासाठी हा पुरस्कार दिला जात आहे. मारिया यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी कराकस, वेनेज्युएला येथे झाला होता.
शांततेच्या नोबेल जाहीर करताना समितीने म्हटले, “जीव धोक्यात असतानाही त्यांनी देशात राहण्याचा निर्णय घेतला आणि अन्यायाविरोधात उभा राहिला.” गेल्या वर्षी मारिया यांना देशात राहण्यासाठी लपून राहावे लागले होते, मात्र त्यांनी देश सोडले नाही.
मारिया कोरिना मचाडो यांना आधीही अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. २०२४ मध्ये युरोपीय संघाचा सखारोव्ह पुरस्कार मिळाल्याची नोंद आहे, जो मानवाधिकार क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
या नोबेल शांतता पुरस्कारासह सुमारे ७ कोटी रुपये आणि मेडलही मारिया यांना मिळणार आहेत.
Editer sunil thorat



