जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

भाग २.. बेकायदेशीर प्लॉटिंगचा सुळसुळाट! पूर्व हवेलीत भू-माफियांची मनमानी ; प्रशासनाच्या निष्क्रीयतेने नागरिक हैराण…

लोणी काळभोर / पूर्व हवेली : पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील पूर्व हवेलीत बेकायदेशीर प्लॉटिंगचा व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत आहे. शेतजमिनींचे बोगस लेआउट, चुकीची सॅन्क्शन कागदपत्रे, तसेच “एनए” आणि “पीएमआरडीए सॅन्क्शन” असल्याचे खोटे दावे करून प्लॉट धारकांची आर्थिक लूट सुरू आहे. परिणामी प्लॉट खरेदीदारांच्या फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून नागरिकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे.

शासकीय नियमांची पायमल्ली करून भू-माफिया आणि त्यांचे एजंट नियमबाह्य पद्धतीने प्लॉट विक्री करत आहेत. जमिनीचा ७/१२ उतारा, झोनिंग, पीएमआरडीए मंजुरी, महसूल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यांचा कोणताही ठोस पुरावा न देता लाखो रुपयांचे व्यवहार होत आहेत. प्रत्यक्षात या जमिनी शेती उपयोगाच्या, डीपी झोनबाह्य किंवा सरकारी आरक्षित भूखंड असल्याचे अनेक ठिकाणी उघड झाले आहे. अशा प्लॉटचे नोंदणी झाल्यानंतर बांधकाम परवानगी नाकारली जात असल्याने सर्वसामान्य नागरिक फसवले जात आहेत.

स्थानिक ग्रामपंचायती, पीएमआरडीए आणि महसूल विभागाच्या आळशी व निष्क्रिय भूमिकेमुळे या अवैध व्यवहारांना चालना मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीर रस्ते तयार करून, फलकबाजी करीत खुलेआम प्लॉटिंग केली जात आहे. यावर तातडीने अंकुश ठेवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सुविधा जागा आणि मोकळ्या जागांचा बळी…

प्लॉटिंगमध्ये विकास नियंत्रण नियमांनुसार मोकळी जागा ठेवणे बंधनकारक असते. अग्निशमन दल, पोलिस, तसेच आपत्कालीन सेवांना ये-जा करण्यासाठी या जागा अत्यावश्यक असतात. परंतु अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून या सुविधा जागा गिळंकृत केल्या जात आहेत.

ॲमिनीटी स्पेस’ म्हणजे उद्याने, शाळा, रुग्णालये, बाजारपेठा, पोलिस ठाणे, अग्निशमन केंद्रे यांसारख्या सार्वजनिक सुविधा पुरविण्यासाठी राखीव असलेली जागा – या जागा बेकायदेशीररित्या विक्रीस काढल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा सुविधा जागा न ठेवल्यास शहराचा सुनियोजित विकास होणे अशक्य ठरते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो.

कारवाईची मागणी…

पूर्व हवेलीतील नागरिक आणि शेतकरी यांनी प्रशासनास मागणी केली आहे की, पीएमआरडीए, महसूल व जिल्हा प्रशासनाने तत्काळ संयुक्त तपासणी करून बोगस प्लॉटिंग करणाऱ्या भू-माफियांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. अन्यथा नागरिकांच्या फसवणुकीची ही साखळी अधिकच विकोपाला जाईल. यात शंका नाही. “म्हातारी मेल्याचे दु:ख पण काळ सोकावता कामा नये”.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??