पुणे : माहेरी लग्न असताना तू आता जाऊ नको, आपण दोघही नंतर जाऊ असे सांगितल्याच्या कारणावरुन सासु, सासरे, मेव्हण्याने चिडून जावयाला लोखंडी सळईने बेदम मारहाण करुन जखमी केले.
याबाबत राजेंद्र मालखान वाल्मिकी (वय ३६, रा. भैरवनाथ नगर, कोंढवे धावडे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सासरे मनोज हरिसिंह (वय ५६), सासु (वय ५०), मेव्हणा राजकुमार मनोज हरिसिंह (वय २४, सर्व रा. गाडीअड्डा, पीसीबी क्वाटर्स, खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढवे धावडे येथील भैरवनाथनगर येथे ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र वाल्मिकी यांची पत्नी आशा हिच्या माहेरी लग्नाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आशा हिला माहेरी जायचे होते. तेव्हा राजेंद्र आपल्या पत्नीला म्हणाले की, लग्नासाठी आता तू जाऊ नकोस, आपण दोघेही नंतर जाऊ, असे म्हणाले. हे समजल्यावर फिर्यादीचे सासु सासरे फिर्यादीच्या घरी आले. तुम्ही आशा हिला आता माहेरी का पाठवत नाहीस या कारणावरुन चिडून जाऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. यावेळी फिर्यादीचा मेव्हणा राजकुमार याने त्याच्याकडील लोखंडी सळईने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पंजास मारुन जखमी केले. पोलीस हवालदार भगत तपास करीत आहेत.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा