तरुणास दगड, लोखंडी हत्यार व चामड्याच्या पट्ट्याने मारहाण…

तुळशीराम घुसाळकर
पुणे (ता. हवेली) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एक तरुणास दगड, लोखंडी हत्यार व चामड्याच्या पट्ट्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी १० ते १५ जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम पोपट काळभोर (वय २२, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर) हा जखमी झाला असून त्याच्या फिर्यादीवरून शंतनु धुमाळ (रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी), तेजस काळभोर (रा. रायवाडी), शुभम विरकर (रा. विरकरवस्ती, रायवाडी), साहिल कोल्हे (रा. रायवाडी, लोणी काळभोर) यांच्यासह १० ते १५ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना शुक्रवार (२२ ऑगस्ट) रोजी दुपारी दोनच्या सुमारास ग्रामपंचायत हद्दीतील श्री. अंबरनाथ मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर घडली. याआधी दुपारी महाविद्यालयात शुभम काळभोरचे मित्र ओंकार काळभोर व अशोक काळभोर यांचा साहिल कोल्हेसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर ‘वाद मिटवूया’ या बहाण्याने शुभम काळभोरला बोलावून घेतले.
दरम्यान, शंतनु धुमाळ याने लोखंडी हत्याराने डोक्यात प्रहार करत “आज थोडा मारलाय, परत तावडीत सापडलास तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. तर शुभम विरकर याने चामड्याच्या पट्ट्याने, साहिल कोल्हे याने हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. याच वेळी आजूबाजूला असलेल्या इतरांनी दगड फेकून हल्ला चढवला.
या हल्ल्यात शुभम काळभोर गंभीर जखमी झाला असून त्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी पुढील तपास करत आहेत.
Editer sunil thorat




