महाराष्ट्र

२१ जिल्ह्यांची निर्मिती; २६ जानेवारीला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता..

महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे.

नागपूर : राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत.

        येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

        दरम्यान महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, त्यावेळी राज्यात फक्त २५ जिल्हे होते. नंतरच्या काळात राज्यातील लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रशासनिक गरजांमुळे नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. २०१४ साली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्हा तयार करण्यात आला होता. २०१८ मध्ये राज्य सरकारच्या समितीने २२ नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव सादर केला होता. सध्याच्या प्रस्तावात त्यापैकी बहुतेक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

          नवीन २१ जिल्ह्यांची प्रस्तावित यादी-

भुसावळ (जळगाव)

उदगीर (लातूर)

अंबेजोगाई (बीड)

मालेगाव (नाशिक)

कळवण (नाशिक)

किनवट (नांदेड)

मीरा-भाईंदर (ठाणे)

कल्याण (ठाणे)

माणदेश (सांगली/सातारा/सोलापूर)

खामगाव (बुलडाणा)

बारामती (पुणे)

पुसद (यवतमाळ)

जव्हार (पालघर)

अचलपूर (अमरावती)

साकोली (भंडारा)

मंडणगड (रत्नागिरी)

महाड (रायगड)

शिर्डी (अहमदनगर)

संगमनेर (अहमदनगर)

श्रीरामपूर (अहमदनगर)

अहेरी (गडचिरोली)

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??