
पुणे (हवेली) : श्रावण महिना हा निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. या महिन्यात भरपूर पाऊस असल्यामुळे झाडे चांगली वाढतात. श्रावण सोमवार हा भगवान शंकराचा वार असल्याने, या दिवशी वृक्षारोपण करणे शुभ मानले जाते. वृक्षारोपण करणे ही एक पवित्र गोष्ट आहे.
यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाते आणि निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होते. याच समवेत हवा शुद्ध होते, मातीची धूप थांबते आणि जलचक्र व्यवस्थित चालते. झाडे वातावरणाला अधिक सुंदर बनवतात. झाडे पशू-पक्ष्यांसाठी घरटी आणि अन्न पुरवतात. वृक्षामुळे नैसर्गिकरित्या थंड हवा आणि सावली मिळते. भूस्खलन आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळते. असे प्रतिपादन हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड लोणी काळभोरचे प्रबंधक गौरव गुप्ता यांनी केले.
ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व आभार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्याचे औचित्य साधून तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय परिसरांत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड चे सी ए असिस्टंट मनोज पाटील, आभार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवरूप तुपे, ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाउंडेशनचे सचिव प्रतीक कोळपे, पुणे जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे, हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, आभार फाउंडेशनचे अक्षय देवकर ,चेतन बोडरे, श्रीकांत झुंझुर्के, संतोष वडुडे, अजय यादव, अमोल बंधारी, राम शिंदे, नागेश भाऊ, दिलीप शेवाळे, संदीप जारे यांचे समवेत मोठ्या प्रमाणात निसर्ग प्रेमी उपस्थित होते.
यावेळी आभार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवरूप तुपे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की वृक्षारोपण करणे ही एक चांगली गोष्ट आहे आणि आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हावे. श्रावण मासाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक तरी झाड लावावे, ज्यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाईल.
यावेळी कन्या प्रशाला व पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ५०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण केले. वृक्षारोपण झालेनंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मुलींना छत्री वाटप करण्यात आले.
Editer Sunil thorat








