
लोणी काळभोर (हवेली) : देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या वतीने “Run For Unity & Ekta Diwas” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ही मॅरेथॉन ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता लोणी काळभोर पोलीस स्टेशनसमोरून सुरू होणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), रंजनकुमार शर्मा (पोलीस सहआयुक्त), मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त), राजकुमार शिंदे (पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५) आणि अनुराधा उदगले (पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर) राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
मॅरेथॉनचा मार्ग लोणी काळभोर पोलीस स्टेशन – श्रीदत्त मंदिर चौक – रायवाडी रोड – श्रीमंत अंबरनाथ मंदिर – रामदारा रोड – पाषाणकर बाग चौक – पालखी मैदान, कदमवाक वस्ती (हवेली, पुणे) असा ठेवण्यात आला असून, एकूण अंतर ३ किलोमीटर आहे.
या मॅरेथॉनद्वारे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, भाईचारा आणि देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या “Run For Unity & Ekta Diwas” मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Editer sunil thorat



