लोणी काळभोर पोलिस स्टेशन पुन्हा चर्चेत ; “वसुली आका”चा छुपा खेळ उघड?
"वसुली आकाचा" वरदहस्त असल्याच्या चर्चेला उधाण; पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय कारवाई करतील?

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : शहरात गेल्या काही महिन्यांत वाढत्या गुन्हेगारीचा विचार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिस्तीचा बडगा उगारला आहे. नियमबाह्य वर्तन करणारे आणि अवैध धंद्यांना मूक पाठिंबा देणारे अधिकारी त्यांच्या निशाण्यावर आहेत.
त्यांच्या पारदर्शक आणि कडक कारभारामुळे ते “कडक शिस्तीचे अधिकारी” म्हणून ओळखले जातात. मात्र, काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस स्टेशन वारंवार वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आलं आहे.
पूर्वीच्या वादांनी हादरलेलं लोणी काळभोर पोलीस ठाणं…
अवघ्या काही महिन्यांपूर्वी चोरीच्या मोटारसायकलीच्या तपासादरम्यान काही पोलिस कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य वर्तनाचे आरोप झाले होते. या प्रकरणात संबंधित पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात आलं होतं.
यानंतर थेऊर परिसरातील गोळीबाराच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात तपासात दिशाभूल व आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप झाल्याने पोलीस उपनिरीक्षकाला सस्पेंड करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांमुळे लोणी काळभोर ठाण्याची प्रतिमा डळमळली होती.
आता अवैध धंद्यांचा मुद्दा तापला आता पुन्हा एकदा लोणी काळभोर परिसरात अवैध ताडी विक्री आणि गांजा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील एका नामांकित शिक्षण संस्थेजवळ हे धंदे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
बातमी झळकल्यानंतर पोलिसांनी ठिकाणी भेट दिली, मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यामुळे पोलिसांवर संगनमताचे आरोप होत आहेत.
२६ ऑक्टोबरची संशयास्पद घटना स्थानिक साक्षीदारांच्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारास ११ वाजता पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले, परंतु कारवाई न करता फक्त “चौकशीसाठी आलो” एवढेच सांगण्यात आले.
काही दिवसांनी पुन्हा ताडी आणि गांजा विक्री सुरू झाल्याने चर्चा रंगली… “पोलिसांनी काही कारणास्तव माघार घेतली का?”
‘वसुली आका’चा छुपा प्रभाव असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या संपूर्ण प्रकरणामागे एका मोठ्या ‘वसुली आकाचा’ वरदहस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याच्या इशाऱ्यावर अनेक अवैध धंदे सुरू राहतात, आणि बातमी लागली की काही दिवसांसाठी बंद होतात अनेकांनी या आकाकडून “संरक्षण फी” मागितली जात असल्याचा आरोप ही चर्चेचा विषय ठरत आहे.
काही धाडसी पोलिसांनी लहान प्रमाणात गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून ५० ग्रॅम गांजा जप्त केला, परंतु त्याच परिसरातील अवैध ताडी विक्रीवर मात्र गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे प्रश्न अधिकच गडद झाले आहेत. स्थानिकांमध्ये कुजबुज सुरू आहे. की “त्या ठिकाणी वसुली आकाचा वरदहस्त असल्यामुळेच कारवाई थांबवली गेली!”
नवा व्हिडिओ आणि नवा अवैध धंदा….
इंदिरानगर परिसरातील अवैध ताडी विक्रीचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्थानिकांचा थेट सवाल “अवैध धंद्यांना छुपा पाठिंबा देणारा ‘वसुली आका’ कोण?”
“त्याचा वशिला एवढा मोठा का?”
“आणि पोलीस प्रशासन मौन का बाळगतंय?
या घटनेने नागरिकांचे लक्ष आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. कठोर शिस्तीच्या प्रतिमेमुळे लोकांना अपेक्षा आहे की, “वसुली आकाचा शोध घेऊन त्याच्यावर आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
वारंवार वादग्रस्त तपास, संशयास्पद कारवाया आणि आता अवैध धंद्यांचे सावट लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. “त्या वसुली आकावर आता कारवाई होते का?” “की पुन्हा एकदा प्रकरण धूळफेक करून थंड केलं जाणार?” या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसांत मिळतील,
आणि त्यावरच ठरेल. पोलीस प्रशासनाची खरी परीक्षा!
Editer sunil thorat




