
फुरसुंगी (हडपसर) : रमणलाल शहा माध्यमिक विद्यालय, आदर्शनगर-गंगानगर फुरसुंगी येथील शिक्षक शहादेव उदमले यांना “लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार 2025” या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मंत्रालयासमोर येथे मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी हा भव्य सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन क्रांती ग्राम विकास संस्था व विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजक सुरेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत व भव्य आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा. ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष, आयुष्मान भारत मिशन समिती, महाराष्ट्र राज्य), अभिनेत्री अलकाताई कुबल, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड तसेच सिनेअभिनेते रोहित कोकाटे उपस्थित होते.
कार्यक्रमात सुहासिनी केकाणे, सुरज भोईर, रवी, अन्विता दास, मनोज देसाई आदी मान्यवरांनी सन्मानार्थींना शुभेच्छा दिल्या.
शहादेव उदमले सर यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, समाजातील जनजागृती, नवकल्पक दृष्टीकोन आणि कार्यतत्परतेमुळे हा मानाचा पुरस्कार मिळवला. त्यांच्या कार्यामुळे समाजात प्रेरणादायी बदलांची नवी दिशा निर्माण झाली आहे.
या सोहळ्यात मानपत्र, ओळखपत्र, सन्मानचिन्ह, अभिनंदनपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष सहकार्य नेहरू युवा केंद्र (भारत सरकार) संलग्न क्रांती ग्राम विकास संस्था, बीड यांच्याकडून मिळाले.
या सन्मानामुळे उदमले यांच्या कार्याला नवचैतन्य मिळाले असून त्यांनी समाजहित, कौशल्यविकास आणि सकारात्मक बदलासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
या यशाबद्दल नवचैतन्य मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष ऍड. अशोक सुरवसे, तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता बडेकर, प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा ससाणे आणि प्रज्ञा शिशुविहारच्या मुख्याध्यापिका वैशाली नाईक यांनी उदमले सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Editer sunil thorat



