महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकींचा बिगुल! ठाकरे, शिंदे, पवार गटांसह ४३५ पक्षांची नवी यादी जाहीर ; चिन्हांचं वाटप पूर्ण…

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका औपचारिकपणे जाहीर झाल्या असून २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन तारीखा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात हलचल वाढली आहे.
आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ४३५ राजकीय पक्षांची नवी यादी जाहीर केली असून निवडणूक चिन्हांचं वाटपही पूर्ण झालं आहे.
कोणाला मिळालं कोणतं चिन्ह?
—शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) — मशाल
—शिवसेना (एकनाथ शिंदे) — धनुष्यबाण
—राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) — घड्याळ
—राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) — तुतारी वाजवणारा माणूस
राज्य आणि केंद्रातील प्रमुख राजकीय गटांना वेगवेगळी चिन्ह देत आयोगाने स्पष्ट केलं की, अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून राहील.
राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला मोठा दिलासा…
लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि ‘पिपाणी’ या दोन चिन्हांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता आयोगाने ‘पिपाणी’ चिन्ह कायमस्वरूपी रद्द करून फक्त ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ठेवले, ज्यामुळे पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
आरक्षणानंतर जल्लोषाचा माहोल…
आरक्षणाची यादी प्रसिद्ध होताच अनेक प्रभागांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवडी प्रभागात जल्लोष केला. प्रभाग क्रमांक 206 सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्याने पडवळ यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुका रंगतदार होणार! चिन्हं स्पष्ट, रणांगण सज्ज — आता थेट जनतेचा निर्णय!
Edited sunil thorat



