
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : पश्चिम महाराष्ट्रातील दलित हक्क, सामाजिक न्याय आणि चळवळीच्या आघाडीवर सतत लढा देणारे गणेश थोरात, दलित पँथर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच भीम राष्ट्रसेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या दुहेरी जबाबदाऱ्यांमुळे प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. सामाजिक प्रश्नांसाठी घेतलेल्या लढ्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला प्रदेशात मोठा विश्वास मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत स्वातीताई गणेश थोरात यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून दावा दाखवला असून, परिसरात त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
स्थानिक समस्यांवर थेट आवाज उठवणे, वंचित घटकांसाठी सातत्याने केलेला संघर्ष आणि विकासकामांना दिलेला प्राधान्यक्रम या भूमिकेमुळे थोरात दाम्पत्याला जनतेत प्रचंड पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः महिलांच्या प्रश्नांवर स्वातीताईंचे संवेदनशील काम आणि गणेश भाऊंची लढाऊ भूमिका यामुळे हवा तयार होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरातून सुरू झालेल्या समर्थनाच्या लाटेमुळे हवेली तालुक्यातील निवडणूक रंगतदार बनण्याची चिन्हे दिसत आहेत. लवकरच प्रचाराचा धडाका सुरू होण्याची शक्यता असून, स्थानिक राजकारणात थोरात परिवाराचे अस्तित्व आणखी भक्कम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat



