
लोणी काळभोर (ता. हवेली) : ग्रामपंचायत लोणी काळभोरच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. यामध्ये साविता नितीन जगताप यांची बिनविरोध निवड होऊन ग्रामविकासाला नवी दिशा देणारी सुरुवात झाली. निवड झाल्यानंतर आयोजित सत्कार सोहळ्यास परिसरातील मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी प्रमुख उपस्थितीत प्रशांतदादा काळभोर (संचालक कृ.उ. बाजार समिती), पैलवान राहुल भाऊ काळभोर (महाराष्ट्र केसरी), सिताराम लांडगे (कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ), संजय तात्या गायकवाड (मा. जि.प. सदस्य), आण्णासाहेब ग. काळभोर (मा. उपसरपंच), ज्ञानेश्वर काळभोर (मा. चेअरमन वि.वि.सेवा सोसायटी), राजेंद्र काळभोर (मा. उपसरपंच), राहुल आप्पा काळभोर (संचालक खरेदी विक्री संघ), हेमंत गायकवाड (अध्यक्ष अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट), बापुसाहेब बोरकर (संचालक साधना सहकारी बँक), वंदनाताई प्रशांतदादा काळभोर (मा. सरपंच), बाळासाहेब ज. काळभोर (मा. ग्रा.पं. सदस्य), युवराज काळभोर (अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती), विद्यमान सरपंच नागेश अंकुशराव काळभोर, सदस्य राजाराम काळभोर, राहुल काळभोर, योगेशनाना काळभोर, भरत काळभोर, गणेश कांबळे, सुनील गायकवाड, सदस्या सविताताई लांडगे, प्रियांकाताई काळभोर, ललिताताई काळभोर, भारतीताई काळभोर, ज्योतीताई काळभोर, पांडुरंग केसकर (मा. ग्रा.पं. सदस्य), गुरुदेव काळभोर (चेअरमन वि.वि. सेवा सोसायटी), संजय काळभोर, अमोल कोळपे, रमेश भोसले (शिवसेना जिल्हा संघटक), सचिन आण्णा काळभोर, गिताराम लांडगे, नेता केसकर, नितीन जगताप, ब्रम्हादादा गायकवाड, लक्ष्मण जगताप तसेच ग्रामपंचायत अधिकारी एस.एन. गवारी यांची विशेष उपस्थिती होती.
ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या उपसरपंचांचे अभिनंदन केले व विकासकामांसाठी शुभेच्छा दिल्या. उपसरपंचपदी साविताताई जगताप यांची निवड ही ग्रामपंचायतीच्या पुढील कामकाजाला बळकटी देणारी ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat





