
हडपसर (पुणे) : मांजरी बुद्रुकसह पुणे मनपात समाविष्ट झालेल्या गावांमध्ये महिलांच्या मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या हडपसर विधानसभा महिला आघाडीने आज PMC प्रशासनावर जोरदार दबाव आणला. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त रवी खंदारे यांना निवेदन देत गर्दीच्या ठिकाणी व मुख्य रस्त्यांवर महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृहांची तातडीने उभारणी करावी, अशी कडक मागणी करण्यात आली.
यासोबतच पीएमपीएमएल बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि स्वच्छ कक्ष (फीडिंग रूम) उभारण्याची तातडीची गरज महिला आघाडीने अधोरेखित केली. “महिलांसाठी मूलभूत सुविधा नसेल तर प्रशासनाची विकासाबाबतची कोणतीही भाषा ग्राह्य नाही,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना उपशहर संघटिका विद्या होडे, हडपसर विभाग संघटिका वर्षा खलसे, युवासेना उपविभाग अधिकारी राहुल खलसे, उपविभागप्रमुख संतोष होडे, तसेच सुशीला साखरे, पूजा खंडागळे, सुलोचना खलसे, सचिन लोंढे, सुमित राखपसरे, किरण खलसे आदी उपस्थित होते.
महिला आघाडीने सांगितले की, “महानगरपालिकेने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू,” असा इशारा देखील प्रशासनाला देण्यात आला.
Editer sunil thorat





