
हडपसर (पुणे) : संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात कडक भूमिका घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या हडपसर विधानसभा महिला आघाडीने आज हडपसर पोलीस स्टेशनवर धडक दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मोगले यांना दिलेल्या निवेदनातून महिला दक्षता समिती तातडीने सक्षम करावी, अत्याचार करणाऱ्यांवर कठोर व निर्णायक कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
महिला सुरक्षेच्या प्रश्नावर पोलीस प्रशासनाने ढिलाई न करता तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी आक्रोशपूर्ण मागणी निवेदनात नोंदवण्यात आली.
या वेळी पुणे शहर निवडणूक समन्वयक विद्या होडे, हडपसर विभाग संघटिका वर्षा खलसे, उपविभाग प्रमुख संतोष होडे, युवा सेना उपविभाग अधिकारी राहुल खलसे, तसेच सुशीला साखरे, सुलोचना खलसे, पूजा खंडागळे, सुमित राखपसरे, किरण खलसे, सचिन लोंढे आदींची उपस्थिती होती.
संविधान दिनानिमित्त महिला आघाडीच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली. महिला शक्तीचा हा तीव्र आवाज आता पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा करीत आहे.
Editer sunil thorat





