जिल्हासामाजिक

अनधिकृतपणे प्लॉटवर बांधकाम करणारे रडारवर…

                                                                                     फोटो – सोशल मीडिया

पुणे : अनधिकृतपणे प्‍लॉटवर बांधकाम करणारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्‍या (पीएमआरडीए) रडारवर आले आहेत. खेड तालुक्‍यातील २८ प्‍लॉटधारकांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. एप्रिलमध्ये ही कारवाई केली जाईल, अशी माहिती ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने दिली आहे.

पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकामावरील कारवाईची गती वाढवली आहे. गेल्‍या महिन्‍यात पीएमआरडीए हद्दीतील महामार्गालगत असणाऱ्या अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविण्यात आला होता. कारवाईचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील कारवाईत २६ मार्चपर्यंत सव्वाचार हजार अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. तिसऱ्या टप्यांत पुणे – सातारा रोड (नवले ब्रिज ते सारोळे), हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट, नवलाख उंब्रे ते चाकण, हिंजवडी परिसर – माण या रस्त्यासह महामार्गांवर कारवाई प्रगतिपथावर आहे. यात १७ ते २६ मार्चपर्यंत ७५० अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे.

या कारवाईबरोबरच आता खेड तालुक्‍यातील अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएने लक्ष केंद्रित केले आहे. २८ प्‍लॉटवरील बांधकामे अनधिकृत आढळली आहेत. विविध परिसरात ही स्‍थिती असून त्‍यावर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये बांधकामे निष्कासित करणे, वाढीव बांधकामे पाडणे आदी कारवाई होणार आहे. सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे. पोलिसांकडे बंदोबस्‍ताची मागणी केली आहे. बंदोबस्‍त मिळाल्‍यानंतर या कारवाईला सुरवात होणार आहे. त्‍यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना हा धसका असणार आहे.

                     महिन्‍यात सुमारे ८० तक्रारी

पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकाम आढळल्‍यास त्‍याची तक्रार नागरिकांनी देण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. नागरिकांच्‍या तक्रारीनंतर पीएमआरडीए प्रशासन कारवाई करत आहे. महिन्‍याकाठी पीएमआरडीएकडे सुमारे ८० तक्रारी प्राप्‍त होत आहेत, अशी माहिती अनधिकृत बांधकाम विभागाच्‍यावतीने देण्यात आली.

दीप्‍ती सूर्यवंशी, सहआयुक्‍त, अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभाग.

”खेड तालुक्‍यातील अनधिकृत २८ प्‍लॉटवर आम्‍ही कारवाई करणार आहे. त्‍यासाठी पोलिस बंदोबस्‍ताची मागणी केली आहे. तो मिळाल्‍यास या कारवाईला सुरवात होईल.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??