कृषी व्यापारक्राईम न्युजजिल्हामहाराष्ट्रसामाजिक
पूर्व दिशा झाली पश्चिम! हवेली मोजणी कार्यालयाचा आणखी एक प्रताप उघड…
हवेली मोजणी कार्यालयाचा गोंधळ! पूर्वेकडची जमीन दाखवली पश्चिमेला, शेतकरी महिला अडचणीत...

पुणे : नामांकित कंपनीच्या दबावाला बळी पडून हवेली भूमि अभिलेख कार्यालयाने शेतकरी महिलेची पुर्व दिशेला असलेली शेतजमीन चक्क पश्चिम दिशेला दाखविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मोजणी कार्यालयाच्या या ‘सेटलमेंट’ कारभारामुळे संबंधित महिला अडचणीत आली असून त्या मानसिक दबावाखाली आहेत.
हवेली तालुक्यातील थेऊर येथील गट नबंर १२२ मध्ये (थेऊर-नायगाव शिव रस्ता) हा प्रकार घडला आहे. योहान पुनावाला, दी पुना स्टड फार्म लि., सायझा अॅग्रो अॅड स्टड फार्म्स एल. एल. पी. आणि जयश्री पवार यांची या गटात जमीन आहे. या गटाबाबत अतिअतितातडी हद्दकायम 12498/2024 व अतिअतितातडी हद्दकायम वहिवाटीची 13360/2024 अशा दोन मोजण्या झालेल्या आहेत. या मोजणीच्या प्रकरणात गटातील सहधारकाची अर्जावर कोठेही सही नसताना, तसेच लगतधारकांना खोट्या पत्त्यावर नोटीस पाठवून हा प्रकार परस्पर केल्याची घटना समोर आली आहे.
हद्दकायम मोजणीच्या हद्दी खुणा दाखवल्याची तारीख १२ सप्टेंबर २०२४ व वहिवाटीच्या मोजणीच्या हद्दी खुणा दाखवल्याची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. म्हणजेच तीन महिन्याच्या कालावधीत दोन्ही मोजणीच्या हद्दी खुणा अंतिम केलेल्या आहेत. गटातील सहधारक जयश्री पवार यांची ४२ गुंठे जमीन गटाच्या पुर्व दिशेला म्हणजेच थेऊर-नायगाव शिव रस्ता लगत असून त्यांची वहीवाट देखील तशीच आहे. असे असतानाही त्यांची जमीन गटाच्या पश्चिम दिशेला दाखवण्याचा अजब उद्योग मोजणी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे हवेली मोजणी कार्यालयातील क प्रत नकाशाचा आणखी एक गैरप्रकार समोर आला आहे.
“मोजणी कार्यालयाच्या दफ्तरांमधून अनेक गैरप्रकार समोर” येण्याची शक्यता…
हवेली मोजणी कार्यालयाच्या दफ्तरांमधून अनेक नवीन कारनाम्यांचे किस्से बाहेर येत आहेत. हवेलीचे तत्कालीन उपअधिक्षक व भूकरमापक यांच्यावर खातरजमा न करता चुकीच्या मोजणीची क प्रत दिल्याने येरवडा पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा धुरळा खाली बसण्याच्या आतच एका शेतकरी महिलेची जमीन त्याच गटात दुसऱ्या दिशेला दाखविल्याचा धक्कादायक प्रकार हवेलीच्या मोजणी कार्यालयाने केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सहधारक शेतकऱ्याला कोणतीही नोटीस बजावली गेली नाही. तसेच लगतधारक शेतकऱ्यांना चुकीच्या पत्त्यावर नोटीस पाठवली गेल्याचे उघड झाले आहे.
काय कारवाई होणार? याकडे नागरिकांचे लक्ष…
शेतकरी व नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी हवेली भूमि अभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. तरीही त्यांना विलंबाच्या यादीत ठेवले जाते. मात्र, हवेली भूमि अभिलेख कार्यालयाने थेऊर (ता. हवेली) येथील गट क्र. १२२ च्या दोन्ही क प्रती वेगवेगळ्या दिल्या आहेत. तसेच शेतकरी महिलेची फसवणूक करून दुसऱ्या दिशेला जागा दाखवली आहे. या चुकीच्या कामामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भूमि अभिलेखचे उपसंचालक व जिल्हा अधीक्षक काय कारवाई करणार? आहेत. शेतकरी व नागरिकांना या कारवाईकडे वरिष्ठ काय निकाल देतात हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. याकडे जिल्हासह महाराष्ट्राच्या शेतकरी व नागरिकांचे लक्ष…
विकास गोफणे, उपअधीक्षक भूमि अभिलेख हवेली यांची प्रतिक्रिया खालील प्रमाणे…
संबंधित विषयात तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सखोल तपासणी करण्यात येईल. उपलब्ध पुरावे व कागदपत्रे पाहून आवश्यकता असेल तर संबधितांना सुनावणीची नोटीस बजावण्यात येईल. न्याय प्रणालीच्या गुणवत्तेनुसार प्रस्तुतच्या प्रकरणात योग्य ते आदेश पारीत केले जातील.
Aditar sunil thorat



