गाडी लोहार समाज उन्नती मंडळाचा भव्य कार्यक्रम थाटात संपन्न ; लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे बाळासाहेब शेलार यांना मिळाला राज्यस्तरीय बहुमान…
कल्याण शहरात गाजला गाडी लोहार समाजाचा सन्मान सोहळा ; लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात...

मुंबई : गाडी लोहार समाज उन्नती मंडळाच वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि २१ जूलै रोजी तिसाई हॉल, कल्याण येथे उत्साहात संपन्न झाला.
गाडी लोहार समाज उन्नती मंडळाच वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील राज्य स्तरीय पुरस्काराने ९ मान्यवरांना कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.
या पुरस्कारांमध्ये प्रामुख्याने लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या ३ पदाधिकार्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष बाळासाहेब शेलार, पुणे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दत्ता लोहार, पुणे समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर औदुंबर कळसाईत, पुणे कला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याच बरोबर गणेशजी राऊत खर्डी कर्मयोगी पुरस्कार, सुकलाल हरी लोहार, नाशिक समाज भूषण पुरस्कार, राजेंद्रजी पायरे पनवेल समाज भूषण पुरस्कार, ज्ञानेश्वर सुधाकर ठमके, मुंबई समाज भूषण पुरस्कार, प्रकाश दत्तात्रय व्यापारी, मुरबाड समाज भूषण पुरस्कार, मधुकर भोमजी सूर्यवंशी दानविर पुरस्कार आणि दोन उच्च शिक्षण घेऊन सेवेत दाखल झालेल्या दोन विद्यार्थ्यीनींना गुणी रत्न पुरस्काराने यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात ६० शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने ॲड. युवराज जाधव यांनी आमदार महोदयांना स्थानिक आमदार निधीतून लोहार भवन निर्मितीचि प्रस्ताव मांडण्यात आला. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार यांनी यावेळी मागणी मान्य केल्याचे सांगितले.
यावेळी पुरस्कार सोहळ्याला बाळासाहेब शेलार भोसरी, आण्णासाहेब जोशी, कर्जत, संतोषजी जाधव पनवेल, संजय कोळंबेकर मुंबई, प्रशांत सुकलाल लोहार, नाशिक, सुनिल परमार, नाशिक, राजेंद्र पायरे पनवेल, प्रकाश दत्तात्रय व्यापारी मुरबाड, विजय ताराचंद चव्हाण कल्याण, राजेंद्र छनलाल निळे कल्याण, भानुदास देवलाल पवार बदलापूर, तुषार दिलीप गोराणे कल्याण, वसंत मनलाल सुर्यवंशी कल्याण, दिपक मधुकर राठोड बदलापुर, जनक शंकर लोहार कल्याण, दिनेश जैसवाल डोंबिवली, संजय मेश्राम कल्याण या मान्यवरांसह स्थानिक लोहार समाज बांधव, भगीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष युवराज जाधव, सचिव राजेन्द्र जाधव खजिनदार सुकलाल कुर्हेकर व इतर पदाधिकारी यांनी मेहनत घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Editer sunil thorat







