हुतात्म्यांचे बलिदान स्मरणात ठेवा ; प्राचार्य दत्तात्रय जाधव..

पुणे (हडपसर) : ३० जानेवारी हा दिवस राष्ट्रपिता म.गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी या दिवशी संपूर्ण भारतात सकाळी ११ वाजता दोन मिनिट मौन (स्तब्धता) बाळगून हुतात्मा दिन साजरा केला जातो.
आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत परंतु स्वातंत्र्यसैनिक ,हुतात्मे आणि क्रांतीकारक यांच्या त्यागाचे स्मरण करून आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे. हुतात्म्यांच्या चरित्राचा अभ्यास करून आदर्श घ्यावा. असे प्रतिपादन साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.साधना विद्यालयात आयोजित हुतात्मा दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
साधना विद्यालयातील सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी ११ वाजता मौन (स्तब्धता) बाळगून हुताम्यांना आदरांजली व्यक्त केली. या निमित्ताने विद्यालयातील शिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी हुतात्मागीत सादर केले. तर निडबने मल्लाप्पा, श्रेयश थोरे या विद्यार्थ्यांनी व अश्विनी सावंत यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश कोकाटे यांनी केले. आभार सविता पाषाणकर यांनी मानले तर कार्यक्रमाचे निवेदन कोमल जायभाय यांनी केले.




