स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध…
राज्य निवडणूक आयोगाचा उपक्रम; प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध...

मुंबई : (दि. 09) राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील आपले नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात आली आहे. या यादीनुसार तयार केलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक विभागनिहाय तसेच नगरपरिषद/नगरपंचायतींसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी स्वतंत्र लिंक राज्य निवडणूक आयोगाच्या https://mahasec.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या प्रारूप मतदार यादींच्या छायांकित प्रती संबंधित तहसील कार्यालयात, तर नगरपरिषद व नगरपंचायतींच्या यादींच्या छायांकित प्रती स्थानिक कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. मतदार यादीची प्रत मिळवण्यासाठी प्रत्येक पृष्ठासाठी दोन रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
तसेच प्रारूप आणि अंतिम मतदार यादींच्या विनाछायाचित्र पीडीएफ प्रती डाउनलोड करण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist या संकेतस्थळावरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही माहिती नियोजन समितीचे सदस्य स्वप्निल दत्तात्रय उंद्रे पाटील यांनी दिली असून, नागरिकांनी आपल्या नावाची पडताळणी करून आवश्यक दुरुस्ती वेळेत करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
Editer sunil thorat



